पुण्यातील सॅनिटायजर बवणाऱ्या कंपनीत भीषण आग, १४ महिला मजुरांचा मृत्यू

पुणे : हिंजवडी येथील पिरंगुट एमआयडीसी (MIDC) मधील उरवडे गावच्या हद्दीत असलेल्या एका सॅनिटायजर बनवणाऱ्या कंपनीला (sanitizer-manufacturing-company) भीषण आग (fire) असून, १४ महिला मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर कंपनीच्या आत आणखी काही मजूर अडकल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. या मजुरांना वाचवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मृत झालेल्या महिला मजूर अत्यंत गरीब घरातल्या असल्याची माहिती पुढे आली आहे.

दरम्यान, आग लागलेल्या कंपनीत सॅनिटायजर बनवत असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले आहे. आतमध्ये अडकलेल्या मजुरांमध्ये काही महिला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली असून, पौड पोलीस आणि संबंधित यंत्रणा आग विझवीण्याचे प्रयत्न करत आहे.

दुपारी अचानक आग लागल्याने बघ्यांनी घटनास्थळी गर्दी केली असून जेसीबीच्या साहाय्याने भिंत फोडून कामगारांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयन्त सुरु असल्याचे समजते. आग नेमकी कशामुळे लागली, ते समजू शकले नाही मात्र, आगीची तीव्रता पाहता आतमध्ये मोठ्या प्रमाणात सॅनिटायजर तसेच इतर ज्वलनशील रसायन साठा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button