विक्रम वेधामध्ये आमिरच्या जागी ऋतिक रोशनची एंट्री

Hrithik Roshan's entry in place of Aamir in Vikram Vedha

विक्रम वेधा हा साऊथचा अत्यंत सुपरहिट सिनेमा आहे. 2017 मध्ये आलेल्या या सिनेमात एक पोलीस इन्स्पेक्टर आणि एका गँगस्टरची थरारक कथा मांडण्यात आली होती. विक्रम वेताळ या लोककथेवर सिनेमातील दोन्ही भूमिका आधारित होत्या. यात आर. माधवनने पोलीस इन्स्पेक्टरची तर विजय सेतुपतीने गँगस्टरची भूमिका साकारली होती.

पोलीस इन्स्पेक्टर जेव्हा जेव्हा गँगस्टरला पकडतो तेव्हा तेव्हा तो काही ना काही कारण सांगून पळून जातो. याचा हिंदी रिमेक करण्याचे अधिकार घेतल्यानंतर आमिर खान (Aamit khan) आणि सैफला घेऊन सिनेमाची निर्मिती केली जाणार होती. सगळी तयारीही पूर्ण झाली होती. परंतु आता आमिर खानने काही कारणांनी सिनेमा सोडला असून तेथे ऋतिक रोशनची (Hrithik Roshan) वर्णी लागल्याचे सांगितले जात आहे.

हिंदी सिनेमाची घोषणा झाली तेव्हा सैफ अली इन्स्पेक्टर आणि आमिर खान गँगस्टरची भूमिका साकारणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आता आमिर खानने माघार घेतल्याने ऋतिक रोशनची सिनेमात एंट्री झाली असून तो गँगस्टरची भूमिका साकारणार असल्याचे सांगितले जात आहे. पुष्कर-गायत्री विक्रम वेधाच्या हिंदी रिमेकचे दिग्दर्शन करणार असून नीरज पांडेने याच्या निर्मितीला हात घातलेला आहे. लवकरच या सिनेमाचे शूटिंग सुरु केले जाईल असे म्हटले जात आहे. ऋतिक रोशन आणि सैफ प्रथमच या सिनेमातून एकत्र काम करताना दिसतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER