ऋतिक रोशन हॉलिवूडच्या गुप्तहेरपटात काम करणार

Hritik Roshan

जगातील सर्वात सुंदर नायकांमध्ये ऋतिक रोशनचा (Hritik Roshan) क्रमांक लागतो. त्याची देहयष्टी आणि सुंदरता ही हॉलिवूडच्या (Hollywood) नायकाच्या तोडीस तोड आहे. परंतु त्याने कधीही हॉलिवूडच्या चित्रपटात काम करण्याचा विचार केला नव्हता. उलट हॉलिवूडप्रमाणे हिंदी चित्रपट बनावेत याकडे त्याचा कल असे. मात्र हॉलिवूडमधील एका मोठ्या चित्रपट निर्माता कंपनीने ऋतिकला घेऊन हॉलिवूडमध्ये एक गुप्तहेरपट बनवण्याचे ठरवले असल्याचे समजते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉलिवूडच्या एका कंपनीने ऋतिकला गुप्तहेरपट करण्याची ऑफर दिली. प्राथमिक बोलणी झाल्यानंतर कंपनीने ऋतिकची ऑडिशन घेण्याचे ठरवले. त्यानुसार नुकतेच एका स्टुडियोत ऋतिकने काही दृश्यांचे शूटिंग केले आणि ते सर्व शूटिंग हॉलिवूडला पाठवण्यात आले आहे. शूटिंग पाहिल्यानंतर चित्रपटाबाबत पुढील बोलणी केली जाणार आहेत. मात्र हा चित्रपट लगेचच सुरु करण्याची योजना असल्याने या चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी क्रिश 4 चे शूटिंग ऋतिकला पूर्ण करावे लागणार आहे अशी माहितीही सूत्रांनी दिली.

यासोबतच ऋतिक रोशनही डिजीटल डेब्यू करणार असल्याचेही सांगितले जात आहे. बीबीसी वर 2016 मध्ये प्रसारित झालेली मालिका ‘द नाइट मॅनेजर’ हिंदीत बनवण्याची योजना आखण्यात आली असून यातील मुख्य भूमिकेसाठी ऋतिक रोशनला साईन केले जाणार आहे. हॉलिवूडच्या चित्रपटानंतर ऋतिक ओटीटी प्लॅटफॉर्मवरही दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER