300 कोटींच्या रामायणात ऋतिक रोशन बनणार राम तर दीपिका सीता

रामायणावर (Ramayana) आणि रामायणातील काही कथांवर आजवर अनेक हिंदी, तामिळ, तेलुगु, मराठी भाषेत सिनेमे तयार करण्यात आलेले आहेत. साऊथमध्ये तर प्रभू श्रीरामांची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याला तेथील जनतेने मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलेले होते. रामायण मालिकेने प्रेक्षकांना लावलेले वेड अजूनही सगळ्यांच्या लक्षात आहे. कोरोना काळात थिएटर बंद होते तेव्हा दूरदर्शनवर रामायण मालिकेचे पुनर्प्रसारण करण्यात आले होते आणि या मालिकेने टीआरपीचा विक्रम केला होता. ही सर्व रामाचीच महती आहे. याच प्रभू रामचंद्रांच्या जीवनावर आधारित आता आणखी एक भव्य दिव्य सिनेमा तयार केला जाणार आहे. आणि या सिनेमात बॉलिवुडमधील सगळ्यात हँडसम ऋतिक रोशन (Hrithik Roshan) राम आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सीतेची भूमिका साकारणार आहे. या सिनेमाचे बजेट थोडेथोडके नव्हे तर 300 कोटी रुपये असणार आहे.

बॉलिवुडमध्ये मधु मंटेना एक नामवंत निर्माते आहेत. गजनी, सुपर 30, क्वीन, रक्तचरित्र दोन भाग, शानदार, मसान, उडता पंजाब अशा वेगवेगळ्या विषयांवरील विविध सिनेमांची निर्मिती केली आहे. याच मधु मंटेना यांनी तीन वर्षांपूर्वी रामायणाचे शिवधनुष्य उचलले. त्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या सिनेमाच्या कथेसाठी स्कॉलर लोकांची नेमणूक करून त्यांनी कथा तयार केली आहे. सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी ‘दंगल’ सिनेमाचा दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्यावर सोपवली आहे. विशेष म्हणजे रामायणाचे दोन भाग तयार केले जाणार असून थोड्या थोड्या अंतराने ते रिलीज केले जाणार आहेत. तसेच हा सिनेमा 3डी मध्ये करण्याची योजनाही आखण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

आपल्या या महत्वाकांक्षी आणि भव्य सिनेमात रामाची भूमिका साकारण्यासाठी ऋतिक रोशन आणि सीतेची भूमिका साकारण्यासाठी दीपिका पदुकोणची निवड मधु मंटेना यांनी केल्याचे समजते. ऋतिक आणि दीपिका ‘फायटर’ सिनेमात एकत्र दिसणार असून हा या दोघांता एकत्र असलेला दुसरा सिनेमा असेल. सुरुवातीला या सिनेमात रावणाची भूमिका प्रभास साकारणार असल्याचे म्हटले जात होते. पण आता तो या भूमिकेत दिसणार नाही. त्यामुळे रावणासह लक्ष्मण, हनुमान आणि अन्य भूमिकांसाठी कलाकारांची निवड लवकरच केली जाणार आहे. याच वर्षी सिनेमा फ्लोअरवर जाईल असे सांगितले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER