हृतिक रोशन बनणार गँगस्टर, तीन महिन्यापासून करतोय तयारी

Maharashtra Today

हृतिक रोशन (Hrithik Roshan) यावर्षी ‘क्रिश ४’ (Krrish 4) चे शूटिंग सुरु करणार असल्याचे म्हटले जात होते. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘क्रिश ४’ च्या स्क्रिप्टचे काम अजून पूर्ण झालेले नसल्याने आता हा सिनेमा पुढील वर्षी सुरु केला जाणार आहे. हृतिक सध्या त्याच्या नव्या ‘फायटर’ (Fighter) सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ‘क्रिश ४’ चे काम लांबल्याने त्याने नवा सिनेमा साईन केला असून या सिनेमात तो गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. गँगस्टर दिसावा म्हणून गेल्या तीन महिन्यांपासून तयारी सुरु केली असून तो वजन कमी करू लागला असल्याचेही सूत्रांनी सांगितले. हृतिक रोशनचा हा २५ वा सिनेमा असणार आहे.

साऊथमध्ये सुपरहिट झालेल्या ‘विक्रम वेधा’ (Vikram Vedha) सिनेमाची हिंदी रिमेक केली जाणार असून यात हृतिक रोशन आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) काम करणार असल्याची बातमी गेल्या वर्षी आली होती. मात्र हृतिक रोशनने सिनेमा साईन केला नसल्याने ही रिमेक बनणार नाही असे म्हटले जात होते. विक्रम वेधा हा साऊथचा सुपरहिट सिनेमा असून यात एक पोलीस अधिकारी आणि एका गँगस्टरची कथा मांडण्यात आली आहे. विक्रम वेधा म्हणजे विक्रम वेताळ. राजा विक्रमादित्य आणि वेताळाची कथा आपल्यापैकी बहुतेकांना ठाऊक आहे. एका गरीब ब्राह्मणाने सांगितल्यामुळे राजा विक्रमादित्य वेताळाला पकडतो आणि राज्यात परत येऊ लागतो. पण रस्त्यात वेताळ राजाला गोष्ट सांगतो आणि जर विक्रमाने उत्तर दिले तर तो पुन्हा झाडाला जाऊन लटकेल. या गोष्टी म्हणजेच वेताळ पंचविशी. या सिनेमातही ही कथा आधुनिक रुपात दाखवली आहे. या मूळ सिनेमात आर. माधवन (R. Madhvan) आणि विजय सेतुपती (Vijay Sethupathi) यांनी अनुक्रमे विक्रम आणि वेताळाची भूमिका साकारली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता हृतिक रोशनने ‘विक्रम वेधा’च्या हिंदी रिमेकमध्ये काम करण्यास होकार दिला असून याचे शूटिंग एप्रिल किंवा मेमध्ये सुरु केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. हृतिक रोशनने या सिनेमातील गँगस्टरच्या भूमिकेसाठी तयारी केली असून तो रोज व्यायाम करून वजन कमी करू लागला आहे. तो सध्या खूपच स्ट्रिक्ट डाएटवरही आहे.

मूळ सिनेमाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केले आहे. हिंदी रिमेकचे दिग्दर्शनही हे दोघे करणार असून हृतिकने नुकतीच या दोघांची भेट घेऊन रिमेकबाबत चर्चा केली आहे. सिनेमाच्या प्री-प्रोडक्शनवर काम सुरु करण्यात आले आहे. हिंदी रिमेकचे नाव अजून नक्की करण्यात आलेले नाही. या सिनेमात हृतिक गँगस्टर तर सैफ अली पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER