हृतिक रोशनचा ‘सुपर ३०’ चित्रपट २६ जुलैला होणार प्रदर्शित

Super 30

मुंबई :- अभिनेता हृतिक रोशनचा बहुचर्चित ‘सुपर ३०’ हा चित्रपट २६ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे . या चित्रपटाचा दिग्दर्शक विकास बहलवर ‘मी टू’ मोहिमेअंतर्गत अनेक महिलांनी लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. विकासवरील आरोपानंतर हृतिकनं त्याच्यासोबत काम न करण्याचा निर्णयही घेतला होता. त्यामुळे काही काळ चित्रपटाचं शुटींग थांबविण्यात आले होते . मात्र आता चित्रपटाच्या प्रदर्शनचा मार्ग मोकळा झाला आहे .

दरम्यान हा चित्रपट कंगनाच्या ‘मणिकर्णिका’सोबत २५ जानेवारीला प्रदर्शित होणार होता. मात्र गेल्या महिन्याभरात या चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल कोणतीही माहिती समोर आली नव्हती . सुपर 30’ हा चित्रपट गणितज्ज्ञ आनंद कुमार यांच्या आयुष्यावर बेतलेला चित्रपट आहे. आनंद कुमार बिहारात ‘सुपर 30’ नावाचा एक प्रोग्राम चालवतात. या प्रोग्रामअंतर्गत आनंद कुमार यांनी आत्तापर्यंत अनेक गरिब व होतकरू मुलांना नि:शुल्क शिकवून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे. जे विद्यार्थी अतिशय हुशार आहेत परंतु आर्थिक अडचणींमुळे आयआयटीच्या परीक्षा देऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना आनंद कुमार संधी देतात. असेच या चित्रपटात दाखविण्यात आले आहे .