प्रियांकाच्या वडिलांच्या आजारपणात या नायकाने केली होती मदत

hrithik Roshan had helped Priyanka father in his illness

बॉलिवूडमधील (Bollywood news) कलाकार एकमेकांच्या मदतीला नेहमीच धावून जातात. पण त्याचा कधीही कुठेही उल्लेख करीत नाहीत किंवा त्याचा प्रचारही करीत नाहीत. बॉलिवूडमध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत. कधी तरी एखादा कलाकार आत्मचरित्र लिहितो तेव्हा तो त्याच्या पुस्तकात अशा मदतीचे उदाहरण सांगतो तेव्हा ते लोकांसमोर येते. ऋतिक रोशन (Hrithik Roshan) बॉलिवूडमधील हँडसमन आणि यशस्वी स्टार तर आहेच तो दुसऱ्या कलाकारांना संकटाच्या वेळी मदत करण्यासही तत्पर असतो. ऋतिकने प्रियांका चोप्राचे (priyanka chopra) वडील आजारी असताना तिला खूप मदत केली होती. ‘अनफिनिश्ड’ पुस्तकात याबाबत प्रियांकाने सविस्तर लिहिले आहे.

प्रियांकाने ऋतिकच्या मदतीबाबत माहिती देताना लिहिले आहे, मला जेव्हा खूप गरज होती तेव्हा ऋतिक रोशनने मला मदत केली होती. माझ्या डॉक्टर असलेल्या वडिलांवर माझे खूप प्रेम होते. त्यांचेही माझ्यावर होते. त्यांना कँसर झाला आणि ते आजारी पडले तेव्हा ऋतिकने मला मदत केली. माझ्या वडिलांवर चांगल्या डॉक्टरांकडून उपचार व्हावेत म्हणून ऋतिकने प्रयत्न सुरु केले. मात्र भारतात वडिलांवर उपचार होत नसल्याने त्यांना लंडनला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. ऋतिक बॉलिवूडचा सुपरस्टार असल्याने त्याने एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांना सांगून एका विमानाची सोयही केली होती. एवढेच नव्हे तर ऋतिक रोशन आणि त्याचे वडील राकेश रोशन यांनी बॉस्टनमध्येही आमच्या कुटुंबाची खूप मदत केली. ऋतिक आणि त्याच्या वडिलांनी मदत केली नसती तर मला वाटत नाही आम्ही बॉस्टनपर्यंत पोहोचू शकलो असतो. ऋतिकने केलेल्या मदतीसाठी मी आजन्म त्याची आभारी आहे. आणि ही गोष्ट मी कधीही विसरणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER