ऋतिक रोशन, दीपिकाचा ‘फायटर’ बॉलिवुडमधील आणखी एक बिग बजेट सिनेमा ठरणार

ऋतिक रोशनच्या (Hrithik Roshan) क्रिश 4 ची सगळे जण आतुरतेने वाट पाहात आहेत. या सिनेमाबाबत अनेक बातम्या रोज येत आहेत. ऋतिक या सिनेमात नायक आणि खलनायक अशा दोन्ही भूमिका साकारणार असल्याचे आम्ही तुम्हाला अगोदर सांगितलेच होते. क्रिशची चर्चा सुरु असतानाच ऋतिकने त्याच्या वाढदिवशी ‘फायटर’ (Fighter) सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर रिलीज करून क्रिशच्या चर्चेला पाठीमागे टाकण्याचे काम केले आहे. सध्या बॉलिवुडमध्ये ऋतिक रोशनच्या या ‘फायटर’ सिनेमाचीच चर्चा सुरु झाली आहे. ऋतिक रोशन आणि दीपिका पदुकोण प्रथमच या सिनेमातून एकत्र दिसणार असल्याने आणि सगळ्यांच्याच नजरा या सिनेमाकडे लागलेल्या आहेत. आता या सिनेमाबाबत आणखी एक बातमी समोर आली आहे आणि ती म्हणजे याच्या बजेटबाबत.

ऋतिक रोशनने 10 जानेवारी रोजी त्याच्या वाढदिवशी ‘फायटर’ सिनेमाची घोषणा करीत मोशन पोस्टरही शेयर केले होते. केवळ पोस्टरच नव्हे तर त्याने यात सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली होती. ऋतिकच्या पोस्टनुसार हा सिनेमा पुढील वर्षी 30 सप्टेंबरला रिलीज केला जाणार आहे. या सिनेमाचे सिद्धार्थ आनंद करीत आहे. सिद्धार्थने यापूर्वी ऋतिकसोबत 2014 मध्ये ‘बँग बँग’ आणि 2019 मध्ये ‘वॉर’ सिनेमा तयार केला होता. अॅक्शनने भरलेले हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरले होते. ‘बँग बँग’ ने 180 कोटी तर ‘वॉर’ने तर 300 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘फायटर’ सिनेमा एक जबरदस्त अॅक्शन सिनेमा असणार आहे. यात हॉलिवुडच्या सिनेमात ज्याप्रमाणे तोंडात बोट घालायला लावणारी अॅक्शन दृश्ये असतात तशी दृश्ये असणार आहेत. यासाठी हॉलिवुडमधून अॅक्शन कोरियोग्राफर आणि स्पेशल इफेक्ट टेक्निशियन बोलावले जाणार आहेत. या सिनेमाचे बजेट जवळ जवळ 250 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

बॉलिवुडमध्ये सगळ्यात जास्त बजेट रजनीकांतच्या 2.0 चे होते. या सिनेमासाठी रजनीकांतने 550 कोटी रुपये खर्च केले होते. त्यानंतर प्रभासच्या बाहुबली- द कन्क्लुजनसाठी 250 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. आणि आता ऋतिकच्या या सिनेमासाठी 250 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER