धूम 4 साठी दीपिकासोबत ऋतिक, जॉन एकत्र येणार!

Dhoom 4

यशराज फिल्म्सने हॉलिवुड सिनेमाच्या धर्तीवर धूम फ्रेंचायजी सादर केली. धूमचे आतापर्यंत तीन भाग प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांनी या तिन्ही सिनेमांना प्रचंड प्रतिसाद दिला. आमिर खानला (Aamir Khan) व्हिलन बनवून तयार झालेल्या धूमच्या यशानंतर लगेचच धूम 4 (Dhoom 4) बाबत चर्चा सुरु झाली होती. 7 वर्षांपूर्वी म्हणजे 2013 मध्ये आलेल्या या सिनेमानंतर धूम 4 ची चर्चा सुरु झाली होती मात्र अजूनही त्यावर काहीही झालेले नाही. आता पुन्हा एकदा धूम 4 ची चर्चा बॉलिवुडच्या वर्तुळात सुरु झाली आहे.

पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोऱ्या करणाऱ्या चोरांची कथा धूममध्ये आतापर्यंत मांडण्यात आलेली आहे. पहिल्या धूममध्ये जॉन अब्राहमने (John Abraham) असा चोर साकारला होता. सिनेमाच्या शेवटी तो दरीत उडी मारताना दाखवला होता. नंतरच्या धूममध्ये ऋतिक रोशन (Hrithik Roshan) आणि ऐश्वर्या राय यांनी चोरांची भूमिका साकारली होती. सिनेमाच्या शेवटी ते दोघेही हॉटेल चालवताना दाखवले होते. तिसऱ्या धूममध्ये आमिर खानने दुहेरी भूमिका साकारत पोलिसांना चकमा दिला होता.

आता पुन्हा एकदा ‘धूम 4’ ची चर्चा सुरु झाली असून यावेळी जॉन अब्राहम आणि ऋतिक रोशन यांना एकत्र आणले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. असे झाले तर जॉन आणि ऋतिक प्रथमच पडद्यावर दिसू शकतील. जॉन आणि ऋतिक दोघेही दिसायला अत्यंत हँडसम असून अॅक्शन हीरो म्हणून त्यांची स्वतःची इमेज तयार केलेली आहे. दोघांच्याही फॅन्सची संख्या प्रचंड आहे. ही बाब लक्षात घेऊनच यशराज यो दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले जात आहे. या सिनेमात दीपिका पदुकोण खलनायिकेची भूमिका साकारणार असल्याचेही म्हटले जात आहे. धूम 4 मध्ये चोऱ्या करणारा नायक नव्हे तर नायिका दाखवली तर प्रेक्षकांना वेगळेपणा मिळेल म्हणून असा प्रयत्न केला जाणार असून यासोबत जॉन आणि ऋतिकची फोडणीही देण्याचा विचार सुरु आहे. असे झाले तर प्रेक्षकांना एका वेगळ्या अॅक्शनपटाचा आनंद घेण्याची संधी नक्कीच मिळेल यात शंका नाही.

जॉन अब्राहम आणि दीपिका यशराजच्या शाहरुख खान नायक असलेल्या पठाणमध्ये एकत्र काम करीत आहे. ऋतिकलाही एका सिनेमासाठी यशराजने साईन केल्याचे सांगितले जात आहे. ऋतिककडे सध्या अनेक प्रोजेक्ट असल्याने तो धूम 4 मध्ये पाहुणा कलाकार म्हणून काम करू शकतो असे सांगितले जात आहे.

बुलेट चालवतानाचा कृतीचा व्हीडियो झाला व्हायरल

बॉलिवुडमधील कलाकार सोशल मीडियावर जास्तच सक्रिय असतात. जरा काही झाले की लगेचच सोशल मीडियावर त्याची माहिती देतात. गेल्या काही दिवसात अनेक नायिकांनी त्यांचे पुल आणि समुद्रातील बिकिनीमधील फोटो सोशल मीडियावर टाकून फॅन्सना ट्रीट दिली होती. कृती सेननने मात्र अन्य नायिकांप्रमाणे बिकिनीतील फोटो न टाकता बुलेट चालवतानाचा व्हिडियो टाकला आहे. कृतीचा हा व्हिडियो प्रचंड व्हायरल झाला असून फॅन्सनी या व्हिडियोला लाईक करीत कमेंट्सही केल्या आहेत.

गेल्या महिन्यात कृती चंदीगढमध्ये राजकुमार रावसोबत तिच्या नव्या सिनेमाचे शूटिंग करीत होती. तेव्हा तिला कोरोनाची लागण झाली आणि ती मुंबईला परतली होती. कृतीने नुकतीच कोरोनावर मात केली आहे. कृती सेननने अक्षयकुमारचा बच्चन पांडे साईन केला आहे. या सिनेमाचे शूटिंग आजपासून राजस्थानमध्ये सुरु होत आहे. सर्व टीम अगोदरच राजस्थानला पोहोचली असून अक्षयकुमार आज सेटवर उपस्थित राहाणार आहे. कृतीने या शूटिंगच्या दरम्यान मधल्या वेळेत तिने बुलेट चालवली आणि तो व्हीडियो सोशल मीडियावर टाकला. या व्हीडियोत कृती सेनन बिनधास्तपणे बुलेट चालवताना दिसत असून तिने हेल्मेटही घातलेले आहे. या व्हीडियोसोबत कृतीने कॅप्शन देताना लिहिले आहे, ‘चार चाके, शरीराला फिरवतात तर दोन चाकं आत्म्याला.’ या व्हीडियोमध्ये बॅकग्राऊंडला लकी अलीचे ‘हैरत’ हे गाणे ऐकायला येत आहे. कृतीने व्हीडियोत म्हटले आहे, या गाण्यासोबत बाईक चालवण्याचे माझे अनेक दिवसांपासूनचे स्वप्न होते. ते आता पूर्ण झाले आहे. कृतीचा हा बाईकवाला व्हीडियो प्रचंड व्हायरल झाला असून तिच्या एका प्रशंसकाने कृती रॉक्स अशी प्रतिक्रिया दिली आहे तर अनेकांनी इमोजी शेअर केल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER