रुपेरी पडद्यावरही एकमेकांसमोर ठाकणार ऋतिक आणि कंगना

Dhaakad - Fighter

असे म्हटले जाते की कंगना रनौतमुळे (Kangana Ranaut) सुपरस्टार ऋतिक रोशनच्या खाजगी जीवनात वादळ निर्माण झाले होते. पत्नी सुझानला घटस्फोट देण्यापर्यंत ऋतिकची मजल गेली होती. सध्या ऋतिक आणि सुझान एकत्र राहात नसले तरी एकत्र आहेत. मात्र ऋतिकने कंगनासोबत नाते तोडले आणि कंगनाचा पारा चढला होता. कंगना आणि तिचि बहीण रंगोली यांनी ऋतिक रोशनसोबत (Hritik Roshan) केलेला ईमेल व्यवहार आणि पाठवलेले मेसेज जाहीर करून ऋतिक कसा प्रेमात होता आणि आता तो कसा पलटत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता. ऋतिकने खाजगी मेल हॅक केल्याचा आरोप करीत कंगनाविरोधात केसही दाखल केली आहे. त्यानंतर कंगना जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा ऋतिकवर तोंडसुख घेत असते. ऋतिक आणि तिच्या प्रकरणाबाबत बोलताना कंगनाने प्रख्यात लेखक गीतकार जावेद अख्तर यांचे नाव घेतल्याने जावेद अख्तर यांनीही तिच्याविरोधात पोलीस आणि न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्या तक्रारीवरून न्यायालयाने कंगनाला नोटीसही पाठवली आहे. खाजगी जीवनासोबतच आता कंगनाने ऋतिकविरोधात रुपेरी पडद्यावरही पंगा घेण्याची तयारी सुरु केली आहे.

बॉलिवूडमध्ये (Bollywood) मोठ्या कलाकारांनी सुट्ट्यांचा सीझन वाटून घेतलेला आहे. ऋतिक रोशन त्याचे नवे सिनेमे गांधी जयंतीच्या मुहुर्तावर म्हणजे 2 ऑक्टोबरच्या आसपास जो शुक्रवार येईल तेव्हा रिलीज करतो. बँग बँग आणि वॉर हे दोन्ही सिनेमे त्याने गांधी जयंतीच्या आसपासच रिलीज केले होते. काही दिवसांपूर्वी ऋतिकने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या नव्या ‘फायटर’ (Fighter) सिनेमाची घोषणा करीत गांधी जयंतीच्या दोन दिवस आधी म्हणजे 30 सप्टेंबर रोजी रिलीज करण्याची घोषणाही केली होती. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या सिनेमात ऋतिक प्रथमच दीपिका पदुकोणसोबत दिसणार आहे.

कंगनाने काही दिवसांपूर्वी तिच्या नव्या ‘धाकड’ (Dhakkad) सिनेमाची माहिती सोशल मीडियावर दिली होती. खरे तर कंगनाचा हा सिनेमा गेल्या वर्षी रिलीज होणार होता पण कोरोनामुळे शूटिंग न झाल्याने पूर्ण होऊ शकला नव्हता. रजनाश घई दिग्दर्शित या सिनेमात कंगना एका नव्या अॅक्शन नायिकेच्या रुपात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत खलनायकाच्या भूमिकेतील अर्जुन रामपाल दिसणार आहे. कंगनाने ऋतिकच्या फायटरसोबतच म्हणजे 1 ऑक्टोबर रोजी धाकड रिलीज करण्याची घोषणा केली आहे. ऋतिकपेक्षा बॉक्स ऑफिसवर मी जास्त यशस्वी आहे हे कंगना ऋतिकला दाखवू इच्छिते आणि म्हणूनच तिने धाकड 1 ऑक्टोबरला रिलीज करण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER