महाराष्ट्र सरकारपेक्षा ऋतिक आणि आदित्य बरे – कंगना

Kangana Ranaut - Hritik Roshan - Aditya Pancholi

न्यायालयाने कंगनाच्या (Kangana Ranaut) ऑफिसमधील बांधकाम तोडल्याबद्दल मुंबई मनपाला (BMC) चांगलेच फटकारले आणि आता कंगनाचे झालेले नुकसान मनपाला भरून देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया देताना तिची दो टके की आणि नटी असा उल्लेख केल्याने कंगना चांगलीच संतापली आहे. त्यामुळेच मुंबई मनपाची तुलना तिने अभिनेता ऋतिक रोशन (Hritik Roshan) आणि आदित्य पंचोलीसोबत (Aditya Pancholi) करीत हे दोघे मनपापेक्षा बरे आहेत असे म्हटले आहे.

कंगना ने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून मनपावर चांगलीच टीका केली आहे. पोस्टमध्ये कंगना म्हणते. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र सरकारने मला प्रचंड त्रास दिला. माझ्यावर खटले दाखल केले, मला शिव्या दिल्या, माझा अपमान केला. त्यांच्यामुळे मला बदनामी सहन करावी लागली. परंतु बॉलीवुड माफिया, ऋतिक रोशन आणि आदित्य पंचोली मला आता त्यांच्यापुढे चांगली माणसे वाटू लागली आहेत. लोकांना त्रास होतो असे माझ्यात काय आहे तेच मला समजत नाही असेही कंगनाने पोस्टमध्ये म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER