सरकार पाडणार नाही मात्र…, असे म्हणत फडणवीसांकडून सुचक संकेत

Devendra Fadnavis - BJP

मुंबई : राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरूनही ऐनवेळी शिवसेनेने (Shivsena) भाजपला (BjP) दगाफटका दिल्याने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. तेव्हापासूनच भाजपला हे सत्य सहजा सहजी पचवणे कठीण जात आहे. हे सरकार अस्थिर असल्याच्या, सरकार पडण्याच्या चर्चा विरोधकांकडून होत असतात. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या स्थैर्याबाबत कायम शंका उपस्थित केल्या जातात.

भाजप ठाकरे सरकार पाडण्याच्या प्रयत्नात आहे असंही कायम बोललं जातं. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडमवीस (Devendra Fadnavis) यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच काही सुचक संकेतही दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकहाती सत्ता आणण्याबाबत बोलत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आजही त्यांनी काही संकेत दिले आहेत.

फडणवीस म्हणाले, राज्यातलं महाविकास आघाडी सरकार पाडण्याची आमची योजना नाही, आम्ही सरकार पाडणारही नाही, तशी इच्छाही नाही. मात्र पडलंच तर पर्यायी सरकार देण्याची आमची तयारी आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने केलेल्या कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारलं आहे. त्यासाठी 8 डिसेंबरला भारत बंदची हाकही दिलीय. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राजकीय पक्षांची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोपही केलाय. दरम्यान, आपसातल्या मतभेदांमुळेच हे सरकार गडगडेल असंही भाजपच्या नेत्यांनी म्हटलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER