कशी होईल ५ लाख कोटींची अर्थव्यवस्था?

निती आयोगाने आणलाय ‘धोरण अहवाल’, स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव पहिला टप्पा

economy

मुंबई :- ‘ट्रीलियन डॉलर इकॉनॉमी’ अर्थात लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था. कुठल्याही देशाच्या विकासाचे हे २१ व्या शतकातील एक महत्त्वाचे परिमाण. ‘विकसनशील’ व ‘विकसित’ अर्थव्यवस्था हे शब्द या ‘ट्रीलियन डॉलर इकॉनॉमी’ शब्दाने मागे टाकले आहेत. यामध्येच केंद्र सरकारने देशाला २०३० पर्यंत ५ लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था करण्याचे लक्ष्य गाठले आहे. या लक्ष्याचा पाठलाग करणारा विशेष ‘धोरण अहवाल’ निती आयोगाने आणला आहे.

५ लाख कोटी लक्ष्याचा पहिला टप्पा २०२२ हा निश्चित करण्यात आला आहे. त्यासंबंधीच्या अहवालाचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी प्रकाशन केले. २०२२ मध्ये देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. तोपर्यंत भारतीय अर्थव्यवस्था सरासरी ९ टक्के दराने विकसित करण्यासाठी काय करायला हवे, हे या अहवालात निती आयोगाने मांडले आहे.

सध्या भारतीय अर्थव्यवस्थेचे आकारमान २ लाख ७० हजार कोटी रुपये आहे. अर्थव्यवस्थेचा स्थिर दराने विकास होत राहील्यास हे आकारमान २०२२-२३ पर्यंत ४ लाख कोटी रुपये होऊ शकेल, असे आयोगाचे म्हणणे आहे. यासाठी कृषी क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करावे लागेल. सध्याचे शेतकरी हे निव्वळ शेतकरी न राहता ते शेती उद्योजक कसे होतील, त्या संबंधीच्या उपाययोजना आयोगाने या अहवालात सुचविल्या आहेत.