…तर संजय राऊत यांच्या पोटात दुखले नसेल असे होऊच शकत नाही : प्रवीण दरेकर

Pravin darekar & Sanjay raut

पुणे :- अण्णा हजारे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या शब्दाला मान देत त्यांच्यावर विश्वास ठेवून केंद्र सरकारविरोधातील आंदोलन स्थगित केले. असे असताना संजय राऊत यांच्या पोटात दुखले नाही असे होऊच शकत नाही, अशी खोचक टीका करत प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी राऊत (Sanjay Raut) यांच्यावर तोफ डागली आहे. प्रवीण दरेकर यांनी सोमवारी पिंपरी-चिंचवड शहराला भेट दिली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अण्णा हजारे (Anna Hajare) यांनी केंद्र सरकारविरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली. हजारे यांनी आंदोलन स्थगित केले. त्यानंतर ‘सामना’तून अण्णा यांच्या या भूमिकेवर तिरकस भाष्य करण्यात आले. याबाबत दरेकर म्हणाले, अण्णांनी देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाला मान देऊन आंदोलन मागे घेतले. त्यामुळे राऊतांच्या पोटात दुखले नाही तर कसे चालेल? अण्णांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वार्थ साधता आला तर आला, असा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या दुर्दैवाने हा स्वार्थ साधता येत नाही. त्यामुळे ‘सामना’च्या अग्रलेखातून कुठल्यातरी निमित्ताने टिका केली जाते.

शिवसेनेच्या करणी आणि कथणीत फरक आहे. संभाजीनगरच्या बाबतीत आम्ही काही तडजोड करणार नाही, असे सांगतात. मग महापालिकेत त्यांची सत्ता आहे. त्यामुळे त्यांनी महापालिकेत ठराव करावा कॅबिनेटचा निर्णय घ्या, केंद्र सरकारच्या मदतीची आवश्यकता लागल्यास आम्ही पुढाकार घेऊ. केवळ जाहीर करणे, घोषणा करणे यापेक्षा कृतीची आवश्यकता आहे. संभाजीनगर, असे नामकरणाची कृती करून दाखवावी, असे म्हणून प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर टिका केली.

ही बातमी पण वाचा : ‘खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा’, अर्थसंकल्पावरुन संजय राऊतांची टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER