कसा आला जन्माला जगातला नंबर वन कोल्ड्रिंक्स ब्रँड ?

Coco-cola

जगातला कोल्ड ड्रिंक्सचा नंबर १ ब्रँड कोका कोला बद्दल माहित नाही, असं क्वचितच कुणी असेल. “ठंडा मतलब, कोका कोला”

जाहिरातीच्या या टॅगलाईनने लोकांना भुरळ घातली.  कोका कोला जगात इतकं प्रसिद्ध आहे कि आता कोणत्याही ऋतूत लोक कोका कोला पित असतात. याच कोका कोलाबद्दल आज जाणून घेऊ.

आज कोल्ड ड्रिंक म्हणून आपण पित असलेला कोका कोला आधी औषधाच्या रूपात विकला जायचा हे तुम्हाला माहितीये का ? हो हे खरंय… कोका कोला आधी औषध म्हणून विकलं जायचं.

सुरुवातीच्या काळात कोका कोलामध्ये कोकेन नावाचं ड्रग्स मिसळलं जात असे. आधी हे पेय दिवसाला ९ ते १० ग्लास इतकंच विकलं जायचं. त्यानांतर लोकांना कोका कोला आवडू लागलं आणि आता कोका कोला कोल्डड्रिंक बनवणारी जगातली सर्वात मोठी कंपनी आहे.
मे १८८६ मध्ये अमेरिकेतल्या डॉ. जॉन पेम्बर्टन यांनी एक पदार्थ बनवला. ते अटलांटामधले एक फार्मिस्ट होते. या पदार्थाला आपल्या फार्मसीत घेऊन जाऊन त्यात त्यांनी सोड्याचं पाणी मिसळलं. त्यांनतर तिथेच उभ्या असलेल्या काही लोकांना त्यांनी हे पेय प्यायला दिलं. या लोकांकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

जॉन पेम्बर्टन यांचा व्यवहार बघणाऱ्या फ्रॅंक रॉबिन्सन यांनी या मिश्रणाला कोका कोला असं नाव दिलं. तेव्हापासून आजपर्यंत हे नाव अधिक अधिक प्रसिद्ध होत गेलं. फ्रॅंक यांच्या मतानुसार ब्रॅण्डच्या नावात दोन C  असण्याचा फायदा होता. जाहिरातीसाठी याचा फायदा होईल असा त्यांचा अंदाज होता. आणि येत्या काळात झालंही तसंच.

सुरुवातीला कोका कोलाच्या कोका कोला विकण्यासाठी प्रति ग्लास ५ सेंट किंमत ठरवली गेली. ८ मे  १८८६ ला सर्वप्रथम जैकब फार्मसीमधूनच पाहिलांदा कोका कोला विकला गेला होता. पहिल्या वर्षी फक्त दिवसाला ९ ग्लासच्या हिशोबाने कोका कोला विकला गेला होता. आज मात्र जगभरात जवळपास दोन अरब कोका कोलाच्या बॉटल दररोज विकल्या जातात.

पहिल्या वर्षी कोका कोलाच्या विक्रीतून फक्त ५० डॉलर येऊ शकले. आणि या कोका कोलाच्या उत्पदनातच ७० डॉलर गेले होते. अशा प्रकारे कोका कोळलेलं पहिल्या वर्षी २० डॉलर रूपयांचा नुकसान झालं.

१८८७ मध्ये अटलांनाटातले व्यावसायिक आणि फार्मासिस्ट आसा ग्रिग्स कॅलेंडर यांनी पेम्बर्टन यांच्याकडून कोका कोला बनवण्याचे फॉर्मुले विकत घेतले. २३ हजार डॉलरमध्ये पेम्बर्टन यांनी हे फॉर्मुले विकले. १८८८ मध्ये कोका कोलाचे जन्मादात्या पेम्बर्टन यांनी जगाचा निरोप घेतला.

आता कॅलेंडर कोका कोलाचे एकुलते मालक होते. त्यांनी पर्यटकांना मोफत कोक द्यायला सुरुवात केली. जास्तीत जास्त लोकांना कोका कोला प्यायला हवं, त्याची चव लोकांना समजायला हवी आणि त्याची सवय लागायला हवी असा त्यांचा उद्देश होता. एकदा लोकांना सवय झाली की लोक पैसे मोजून कोका कोला विकत घेतील हे त्यांना माहित होतं.

ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी पोस्टर, केलेंडर, वह्या अशा विविध ठिकाणी जाहीरात दिल्या. आपल्या क्षेत्रीय ब्रँडला त्यांना राष्ट्रीय ब्रँड बनवायचं होतं आणि ते त्यात यशस्वीही झाले.

१८९० पर्यंत कोका कोला अमेरिकेचा एक यशस्वी ब्रँड बनला होता. कोका कोलाला डोके दुखी दूर करणारं आणि थकवा घालवणारं औषध म्हणून ओळखलं काऊ लागलं. यावर अनेक वादही झाले आणि नंतर या दाव्याला फेटाळून लावण्यात आलं.

सॅन १८९४ मध्ये जोसेफ बीएडनहॉर्न नावाच्या मिसिसिपी मधील व्यावसायिकाने कळणार यांना कोका कोला १२ बॉटल्स मध्ये भरून कॅलेन्डर यांना पाठवला. कॅलेन्डर यांना ही कल्पना प्रचंड आवडली. त्यांनी जोसेफ यांचं कौतुकही केलं. त्यांनी कधीच कोका कोलाबद्दल असा बाटलीत बंद करून विकण्याचा विचार केला नव्हता.

आता कोका कोला बाटल्यांमध्ये विकला जाऊ लागला. पण आता नकली कंपन्यांचा धोकाही वाढू लागला होता. तेव्हा रूट ग्लास नावाच्या एका कंपनीने १९१६ मध्ये बॉटल्स बनवायला सुरुवात केली.

कोका कोला कंपनी वेगाने वाढत होती. १९२३ मध्ये रॉबर्ट वूड्रफ यांनी कॅलेंडर यांच्याकडून कंपनी विकत घेतली. आणि ते अध्यक्ष झाले.  त्यांनी जगभरात या कंपनीचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला.

१९२८ मध्ये पहिल्यांदा ह्या पेयाचा ऑलिंपिक्स मध्ये वापर झाला. जगभरात ही कंपनी विस्तारत गेली. अनेक देशांनी कोका कोलाला विरोधही केला, पण मोजकेच असे देश होते. बाकीच्या जगाने कोका कोलाला स्वीकारलं आहे आणि आज कोका कोला जगातला सगळ्यात मोठा कोल्ड ड्रिंक ब्रँड झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER