रेमडेसिवीरचा काळाबाजार कसा थांबणार? राजेश टोपेंनी सांगितला प्लॅन

Rajesh Tope - Maharashtra Lockdown

जालना :- राज्यात रेमडेसिवीरचा (Remdesivir) तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे. हा तुटवडा पाहता रेमडेसिवीरचे वाटप दोन पद्धतीने करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी माहिती राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली. जालन्यात आज राजेश टोपे यांच्या हस्ते खासगी कोविड रुग्णालयाच्या डॉक्टरांना १० हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचे वाटप करण्यात आले.

रेमडेसिवीरचा काळाबाजार कसा थांबवणार?
रेमडेसिवीरचे उत्पादन करणाऱ्या सात कंपन्यांकडून टेंडर पद्धतीने हापकीन कंपनी सरकारच्यावतीने टेंडर काढून हे इंजेक्शन खरेदी करेल आणि शासकीय रुग्णालयांना पुरवठा करेल. दुसरा मार्ग प्रत्येक जिल्ह्यात एक स्टॉकिस्ट असणार आहे. हा स्टॉकिस्ट जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली काम करेल. त्याला या इंजेक्शनचा पुरवठा केला जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली स्टॉक्सिस्ट इंजेक्शनची गरज लक्षात घेऊन खाजगी रुग्णालयात इंजेक्शन पुरविते. या सर्वांवर जिल्हाधिकाऱ्यांचे नियंत्रण असल्याने काळाबाजार होणार नाही. खाजगी रुग्णालयांना सहज रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होईल. तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनचा टास्क फोर्सने सांगितल्याप्रमाणे योग्य पद्धतीने वापर केल्यास इंजेक्शनचा तुटवडा भासणार नाही, अशी माहितीदेखील टोपे यांनी दिली.

ऑक्सिजनची गळती थांबवून वापर करावा
केंद्राने ऑक्सिजन पुरवठा करावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली आहे. मात्र, कोणतेही राज्य या संदर्भात मदत करायला तयार नाही, उपलब्ध असलेल्या ऑक्सिजनची गळती थांबवून त्याचा चांगल्या पद्धतीने वापर करावा लागेल. हाच मार्ग असल्याचे राजेश टोपे म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ‘ब्रेक द चैन’ संदर्भातील आवाहनाला सर्वांनी घरी राहून सहकार्य करावे, असेही टोपे म्हणाले.

सध्या ऑक्सिजनची कमतरता आहे. जालन्यातील घनसावंगी येथे येत्या १५ दिवसांत हवेतील पूर्ण ऑक्सिजन शोषून घेणारा प्लांट उभारत आहोत. यात यश मिळाले तर संपूर्ण राज्यात असे प्लांट उभे करता येतील. हा प्रयोग यशस्वी झाल्यास लिक्विड ऑक्सिजनला पर्याय मिळेल, असेदेखील टोपे यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button