निवडणूक असलेल्या राज्यांत रुग्णसंख्या कमी कशी? अस्लम शेख यांचा ‘टास्क फोर्स’ला सवाल

Aslam Shaikh

मुंबई : महाराष्ट्रात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वैद्यकीय सेवांचा तुटवडा निर्माण झाला आहे. देशात सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहे. मात्र, याच वेळी विधानसभा निवडणूक असलेल्या पाच राज्यांत  रुग्णसंख्या कमी कशी? असा प्रश्न काँग्रेस (Congress) नेते अस्लम शेख (Aslam Shaikh) यांनी उपस्थित केला  आहे. महाराष्ट्रात सातत्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे.

परंतु, विधानसभा निवडणूक असलेल्या पाच राज्यांत रुग्णसंख्या कमी आहे. अनेक केंद्रीय मंत्री मोठमोठ्या प्रचारसभा घेत आहेत. हजारो लोक एकत्र येत आहेत. तरी त्या ठिकाणी रुग्णांची संख्या कमी कशी? असा प्रश्न कोविड टास्क फोर्सला अस्लम शेख यांनी विचारला आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त गुजरातमध्ये रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात कोरोना (Corona) चाचण्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन करण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button