एखाद्यावर तुमचे प्रेम आहे की क्रश असे ओळखा

Romantic-Indian-young-couple

तुम्ही ज्या व्यक्तीसोबत प्रेमात आहात तेच तुमचे खरे प्रेम आहे का? एका नात्यात राहण्यासाठी हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. प्रेम आणि आसक्ती यांच्यातील हलक्याषा रेषेमुळेसुद्धा बऱ्याचदा खऱ्या प्रेमाची अपेक्षा फोल ठरते. पण, तुम्ही जर आपल्या नात्याकडे गंभीरतेने पाहत असाल, तर आपल्या जोडीदाराच्या हालचालींकडे जरा लक्ष दिलं तर ही हलकिशी सिमारेषाही खरं प्रेम ओळखण्यासाठी पुरेशी ठरते. हे खरं प्रेम ओळखण्यासाठी काही गोष्टींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

Couple Dting१. तुमच्या नजरेत नजर मिळवतांना

शब्दांतून किंवा शब्दांशिवाय तो जेव्हाही तुमच्याशी संवाद साधेल, तेव्हा तो तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलतो का, हे एकदा तरी नक्की तपासा. तो जर तुमच्याशी नजर मिळविण्याकरिता घाबरत असेल तर तुमच्या नात्याचा तुम्ही पुन्हा एकदा विचार करायला हवा.

२. त्याचा तुमच्या शब्दांकडे लक्ष असते का?

टाईमपास करणारे व्यक्ती अनेकदा आपल्या पार्टनरच्या बोलण्याकडे आणि शब्दांमधून व्यक्त होणाऱ्या भावनांकडे दुर्लक्ष करतात. तसेच पार्टनरच्या काही गोष्टी लक्षपूर्वक ऐकून घेऊन त्या समजून घेत नाही. मात्र, तुमच्यावर जे खरं प्रेम करतात, ते तुमच्या प्रत्येक शब्दाला लक्षपूर्वक ऐकतात आणि त्या समजूनही घेतात.

३. भांडण करा, पण प्रेमाने

अनेक नात्यांच्या तुटण्यामागचे कारण म्हणजे त्यांच्या नात्यांमध्ये होणारे वाद, मतभेद आणि भांडण असतात. परंतु, तेच भांडण, तोच वाद तुम्ही प्रेमाने हळू आवाजातही करू शकता. यामध्ये तुमचे नातं तुटण्याची शक्यता कमी असते. तुमच्या पार्टनरला जर तुमची काळजी असेल, तर तो तुमच्याशी कधीच मोठ्या आवाजात भांडणार नाही. मात्र, टाईमपास करणारी व्यक्ती तुमच्या चुकांवर पांघरून घालून कोणताही वाद न घालता पुढे निघून जाऊ शकतो.

४. नात्यातील संवाद

नात्याला महत्त्व देणारे व्यक्ती तुम्हाला मेसेज तर करतील, परंतु त्यांच्या मेसेजमध्ये तुमच्या नात्याशी निगडित काहीही नसेल. तुमचे क्रश तुम्हाला बोअरिंग जोक्स आणि माहिती शेअर करतील. परंतु, तुमच्यावर खरं प्रेम करणारी व्यक्ती मात्र त्याच्या जीवनातील प्रत्येक छोट्या गोष्टीची आणि प्रत्येक घडामोडीची तुम्हाला माहिती देईलच.

५. तो तुमच्या मित्र-मैत्रिणींना भेटतो?

तुमचा पार्टनर त्याच्या खासगी आयुष्यात कितीही बिझी किंवा अस्ताव्यस्त असेल, तरी तुमच्या जवळच्या असलेल्या मित्र-मैत्रीणींशी तो नक्कीच भेट घेईल. परंतु, एखादा जर आपल्या नात्याची पर्वा करत नसेल, तर तो तुमच्या मित्र-मैत्रिणींची कधीच भेट घेणार नाही. तसेच त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न देखील करेल.