गुगल जवळ जमा असलेली तुमची ‘प्रायव्हेट कुंडली’ कशी कराल डिलीट ?

‘डेटा इज न्यू ऑइल’ (Data is new oil) आजच्या इंटरनेच्या युगात हे वाक्य तुम्ही ऐकलंच असेल. तुम्ही वापरत असलेलं इंटरनेट. त्याद्वारे तुमच्या हलचाली टिपून तुमच्याबद्दलचा डेटा जमा करुन विकण्याचे धंदे काही कंपन्यानी सुरु केलेत. हा डेटा विकून कंपन्या अरबो रुपये छापतायेत.

आधी सर्वात जास्त पैसा तेल व्यवसायातून कमावला जायचा.तुमच्या प्रत्येक हलचालीची, विचारांची आणि घेणार असलेल्या निर्णयावर गुगलची नजर असते, ही गोष्ट आपण जाणतोच. गुगल प्ले स्टोअरवरुन कोणतही अ‌ॅप डाऊनलोड करताना आपल्याला त्याच्या अटी आणि शर्थी मान्यच कराव्या लागतात. त्याशिवाय ते अ‌ॅप वापरता येत नाही.

मागच्या महिन्यात व्हाट्स अपने प्रायव्हसी पॉलीसी बदलली. याला भारतासह जगभरातून कडाडून विरोध झाला. अनेकांनी व्हाट्सअप डिलीट केलं. परिस्थीतीच गांभीर्य लक्षात घेत व्हाट्सअपला प्रायव्हसीसंबंधी धोरणं बदलावी लागली. यामुळं भारतासारख्या ठिकाणी सुद्धा इंटनेटसंबंधी लोकांची जागृती आधोरेखित झाली.

व्हाट्सच प्रकरण मिटलं असल तरी गुगलकड तुमच्या संबंधी मोठ्या प्रमाणात माहिती आहे. तिचा गैरवापर होवू नये. इतर कंपन्यांना ती माहिती विकली गेल्याचा तोटा होवू नये, म्हणून गुगलकडे (Google) जमा असलेला तुमचा टेडा तुम्ही डिलीट करायला हवा.

अशी करायची लोकेशन हिस्ट्री डिलीट (Delete history)

प्रत्येक स्मार्ट फोनमध्ये जीपीएसचा पर्याय असतो. आपण कुठे किती वेळ थांबलो होतो यावरुन आपण काय केलं असेल? याचा अंदाज बांधणं सोप्प असतं. लोकेशन हिस्ट्रीमध्ये ही सगळी माहिती जमा होत असते. तुम्ही जर अँड्रॉईड फोन वापरत असाल तर गूगल आपल्या लोकेशनची, म्हणजेच आपण कुठे गेलो, याची माहितीही साठवून ठेवतं.

गूगल मॅपवरची ही माहिती डिलीट करण्यासाठी त्या पेजवर गेल्यावर लोकेशन ट्रॅकिंगचं बटण बंद करायचं. तसंच, सगळी किंवा विशिष्ट माहिती डिलीट करायची.

Waste basket हा पर्याय निवडून एखादा विशिष्ट प्रवास किंवा थांबा काढून नष्ट करता येतो.

यूट्यूबनही साठवला असतो तुमचा डेटा असा करायचा डिलीट

माहिती, मनोरंजन आणि अनेक गोष्टीतलं ज्ञान आत्मसात करण्यासाठी युट्यूब आपल्या उपयोगी पडते. युट्यूब म्हणजे जगातली सर्वांत मोठी व्हीडिओ स्ट्रीमिंग साईट. जगातला कुठलाही लोकप्रिय व्हीडिओ आता तिथे असतोच, तो फक्त आपल्याला शोधावा तेवढा लागतो.

आपण यूट्यूबवर काय शोधतो आणि काय बघतो त्यावरही गूगलचं लक्ष असतं. पण ती माहितीही डिलीट करता येते.

यूट्यूबवर गेल्यावर डाव्या हाताला असलेल्या मेन्यूत ‘History’वर क्लिक करा. त्यात “Clear all search history” आणि “Clear watch history” हे पर्याय निवडा.

जाहिरीतींकडेही असते तुमची वैयक्तीक माहिती

गूगल आपली सगळी माहिती साठवून ठेवतंच, पण त्या माहितीच्या आधारे आपण वावरत असलेल्या वेबसाइट्सवर जाहिरातीही दाखवतं. म्हणजे त्यांच्या सेवा वेबसाईटवर येणाऱ्या अॅड आपण काय शोधलं, पाहिलं किंवा केलं, यावरून ठरवण्यात येतात.

म्हणूनच आपण केलेल्या सर्च किंवा ब्राउझिंगशी मिळत्या जुळत्या जाहिराती आपल्याला दिसू लागतात.

पण काळजी करू नका! गूगलने नेमकी कोणती माहिती जाहिरातदारांना दिली, हे आपण शोधू शकतो. त्यासाठी आपण आपल्या गुगल खात्यात लॉग इन करायचं आणि “Personal info & privacy” या विभागात जायचं.

तिथं पोहोचल्यावर “Ads Settings”चा पर्याय निवडायचा आणि त्यात “Manage ads settings” मध्ये जायचं. त्यात “Ads personalisation” हा पर्याय दिसेल. तो जर “Deactivate” किंवा निष्क्रीय केला, तर आपल्या इंटरनेट ब्राउझिंगवर आधारित जाहिराती थांबतात.

तसं करणं हे तुमच्या हिताचं नसल्याचं गूगल सांगेल. त्यामुळे आपल्याला तशा जाहिराती हव्यात का, हे ठरवून मगच निर्णय घ्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER