‘किती मूर्ख आहे मी !’ कंगनाने उर्मिलाला मारला टोमणा

Kangana Ranaut & Urmila Mantondkar

मुंबई : काँग्रेससोडून (Congress) शिवसेनेत (Shivsena) येताच उर्मिला (Urmila Matondkar) यांनी मुंबईच्या खार पश्चिम परिसरातील लिंकिंग रोड परिसरात कार्यालयासाठी जागा खरेदी केली. कार्यालयाची किंमत तीन कोटींपेक्षा जास्त आहे. यावरून कंगनाने उर्मिला टोमणा मारला – मीसुद्धा तुमच्यासारखी समजदार असते तर काँग्रेसला खूश केले असते. किती मूर्ख आहे ना मी !

‘कंगनाने ट्विट केले – ‘प्रिय उर्मिला मातोंडकरजी, मी स्वत:च्या कष्टाने जे घर बनवले, तेसुद्धा काँग्रेस तोडत आहे. खरोखर भाजपाला खूश करून मी काय मिळवले तर २५ – ३० केसेस. मीसुद्धा तुमच्यासारखी समजदार असते तर काँग्रेसला खूश केले असते. किती मूर्ख आहे ना मी !’

कंगनाने एक मीमही शेअर केले आहे. कंगनाच्या चाहत्यांनी हे मीम तयार केले आहे. यात कंगना व उर्मिला यांच्यातील ‘वॉर’ला मनोरंजक टच देण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना ‘हा हा हा’ असे कॅप्शन कंगनाने दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER