रॉयल चॅलेंजर्सने कशी केली केकेआरशी परफेक्ट फिट्टमफाट!

RCB Ipl 2020

तीन वर्षांपूर्वी राॕयल चॕलेंजर्सच्या (RCB) संघाला नाईट रायडर्सने (KKR) फक्त 49 धावात गुंडाळले होते आणि 82 धावांनी विजय मिळवला होता. तीन वर्षानंतर सोमवारी पुन्हा याच दोन संघात सामना झाला आणि यावेळी राॕयल चॕलेंजर्सने बाजी उलटवली. त्यांनी नाईट रायडर्सना 104 धावात गुंडाळत तेवढ्याच फरकाने म्हणजे 82 धावांनीच विजय मिळवला. 2017 मध्ये केकेआरकडून 82 धावांनी पराभव आणि आता त्याच केकेआरवर 82 धावांनी विजय. परफेक्ट फिट्टमफाट…!

राॕयल चॕलेंजर्सच्या कामगिरीतील हे परिवर्तन एवढ्यावरच थांबत नाही तर भलेही त्यांनी आतापर्यंत आयपीएल (IPL) एकदाही जिंकली नसेल, गेल्या तीन पैकी दोन आयपीएलमध्ये ते शेवटून पहिल्या स्थानी आले असतील पण यंदाच्या मोसमात त्यांनी आतापर्यंतच्या सर्व आयपीएल विजेत्या संघाना मात दिली असेल. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, सनरायजर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स व राजस्थान राॕयल्स यांच्यावर त्यांनी विजय नोंदवले आहेत.

गंमत म्हणजे यंदा त्यांनी जे दोन सामने गमावले आहेत ते नेमके त्यांच्याप्रमाणेच आयपीएल जिंकू न शकलेल्या सघांविरुध्दचे आहेत. किंग्ज इलेव्हन आणि दिल्ली कॕपिटल्सकडून त्यांनी हार पत्करली आहे.

2013 नंतर पहिल्यांदाच त्यांनी पहिल्या सात पैकी पाच सामने जिंकले आहेत आणि ही त्यांची सर्वोत्तम सुरूवात आहे. गेल्या वर्षी ह्याच संघाला पहिल्या सात पैकी फक्त एकच सामना जिंकता आला होता. आता याप्रकारे विराटचा संघ बऱ्याच गोष्टी पहिल्यांदा करत असताना विजेतेपदही पहिल्यांदा पटकावतो का, हेच बघायचे.

ही बातमी पण वाचा : आंद्रे रसेलची विकेट पडताच बघा कर्णधार विराट कोहलीची प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER