‘अजून किती फेकणार मोदीजी, हद्द केली राव’, नाना पटोलेंचा मोदींना मिस्कील टोला

Nana Patole & PM Modi

मुंबई :- बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या ५० वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहेत. भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांनी भारतीय उपखंडातील दहशतवादाचा प्रतिकार करण्यासाठी एकजूट दाखवण्याची आणि जागरूक राहण्याची आवश्यकता असल्याचं मत पंतप्रधान मोदींनी बांगलादेशच्या सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केलं.

ही बातमी पण वाचा : शरद पवार शिवसेनेचे की राष्ट्रवादी काँग्रेसचे, तपासण्याची गरज; नाना पटोलेंचा टोमणा 

दरम्यान ढाका येथील एका कार्यक्रमात बोलताना नरेंद्र मोदींनी बांग्लादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात मी सुद्धा सहभागी झालो होतो, मलाही अटक करण्यात आली होती, असं सांगितलं. मोदींच्या या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर चर्चा रंगली असताना दुसरीकडे विरोधकही त्यांच्यावर निशाणा साधत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी तर मोदींना अजून किती फेकणार, असं म्हणत मिस्कील टोला लगावला आहे.

नाना पटोले यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ‘अजून किती फेकणार मोदीजी, हद्द केली राव. शेतकरी आंदोलनावर एक शब्दही तुमच्या तोंडून निघाला नाही आणि स्वातंत्र्याबद्दल बोलण्यासाठी बांगलादेशला जाता. तुम्ही शेतकऱ्यांना आंदोलनजीवी म्हणाला होतात. आता तुम्ही कोण झालात ढोंगीजीवी’.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER