जाणून घ्या ‘विरुष्का’ची संपत्ती किती आहे?

Virat Kohli - Anushka Sharma

विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) …विरुष्का (Veerushka)! नेहमी चर्चेत राहणारी ही लोकप्रिय जोडी, तेवढीच सफल…यांची मालमत्ता किती असेल काही अंदाज? या जोडप्याची संपत्ती आजच्या घडीला आहे तब्बल 1200 कोटी आणि त्यात भर पडतच आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ही अब्जोपती जोडी आहे. 2017 मध्ये विराट आणि अनुष्का विवाहबध्द झाले आणि दोघेही आपआपल्या व्यवसायातून अनुक्रमे क्रिकेट आणि अभिनय व निर्मिती यातून खोऱ्याने पैसे कमवताहेत.

या जोडप्याचे पॉवर कपल असे वर्णन करण्यात येते कारण विराट हा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार तर आहेच शिवाय जगातील आघाडीच्या फलंदाजांपैकी एक आहे. तर अनुष्का हीसुध्दा बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री असून निर्मातीसुध्दा आहे. दोघांचेही क्षेत्र पूर्णपणे वेगळे असले तरी ते चार वर्षे प्रेमप्रकरणात होते आणि त्यानंतर 2017 मध्ये विवाहबध्द झाले आणि आता त्यांच्याकडे बाळसुध्दा येणार आहे. शॕम्पूच्या जाहीरातीतून झालेल्या ओळखीतून त्यांचा जीवनसाथी बनण्याचा प्रवास झाला आहे.

जानेवारी 2020 मधील हिशेबानुसार या जोडप्याची संपत्ती सुमारे 1200 कोटी रुपये आहे. 2019 मध्ये फोर्बसच्या टॉप 100 यादीत स्थान मिळवणारा विराट हा एकमेव क्रिकेटपटू होता आणि त्याची वर्षभरातील कमाई 252 कोटी 72 लाख दाखविण्यात आली होती. जीक्यु या नियतकालिकानुसार 2019 अखेर विराटची संपत्ती 900 कोटी रुपये होती. त्यानंतर आयपीएल व काही जाहिरातींच्या माध्यमातून त्याला 18 कोटींची कमाई झाल्याचा अंदाज आहे. शिवाय भारतीय मंडळाकडून त्याचे वेतन 7 कोटी आहे. कितीतरी उत्पादनांच्या त्याच्याकडे जाहिराती आहेत. त्याच्या मालकीचे दोन रेस्टॉरंट आहेत. हे सर्व मिळून त्याची संपत्ती एक हजार कोटींपर्यंत असू शकते.

फोर्बसनुसार 2019 मध्ये अनुष्काची कमाई 28.67 कोटी होती. सेलिब्रेटीज 100 च्या यादीत ती 21 व्या स्थानी होती. 2018 मध्ये तिची कमाई याच्या दीडपट 45.83 कोटी रुपये होती. त्यावेळी ती कमाईत 16 व्या स्थानी होती. मात्र तिची एकूण कमाई जवळपास 350 कोटी असल्याचा अंदाज आहे.

अलीकडे ती अभिनय करत नसली तरी आपल्या प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून भरपूर चित्रपटांची निर्मिती करत आहे. शिवाय ती जाहिरातींमध्येही झळकत असते. नूश नावाने तिने आपला फॕशन ब्रँडही बाजारात आणला आहे.

विरुष्काचे मुंबईत अलीशान घर आहे. 7 हजाराच्यावर चौरस फुटाचे हे घरच साधारण 34 कोटी रुपयांचे आहे आणि गुरगावमध्येही त्यांची 80 कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे कळते. याप्रकारे सर्व मिळून विरुष्काची संपत्ती 1200 कोटींच्यावर निश्चितपणे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER