स्पुतनिक लसीची किंमत किती? डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडून दर जाहीर; दोन डोस घेणे बंधनकारक

नवी दिल्ली : रशियातून आलेल्या ‘Sputnik’ लसीची किंमत जाहीर करण्यात आली आहे. या लसीची किंमत ९४८ रुपये असणार आहे. याबाबतची माहिती स्पुतनिक लस आयात करणारी कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने दिली आहे. या डोसला सेंट्रल ड्रग्स लॅबोरेटरीजकडून आवश्यक परवानग्या मिळाल्या असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

मात्र, यावर ५ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. त्यामुळे लसीची किंमत ९४८+५ टक्के GST लागून एकूण ९९५ रुपये मोजावे लागणार आहेत. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने (Dr. Reddy’s Laboratories) स्टॉक एक्सचेंजला ‘स्पुतनिक’च्या डोसच्या किमतीबाबत माहिती दिली आहे. या लसीचेही दोन डोस घेणे अनिवार्य आहे.

डॉ. रेड्डीजच्या माहितीनुसार, राष्ट्रीय रोगप्रतिबंधक प्रयत्नांचा एक भाग म्हणून स्पुतनिक लस जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी ते सरकारी व खाजगी क्षेत्रातील भागधारकांसह एकत्र काम करतील. कोरोना (Corona) साथीच्या आजाराविरुद्ध लढण्यासाठी कंपनी बांधील आहे. भारतात वाढत्या घटनांसह, कोरोनाविरुद्धच्या लढाईत लसीकरण हे आपले सर्वांत प्रभावी साधन आहे. भारतीयांना निरोगी आणि सुरक्षित आयुष्य मिळावे म्हणून या लसीला प्राधान्य देण्यात आले आहे, असे सह-अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक जी. व्ही. प्रसाद यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button