मोदींनी महाराष्ट्राला किती मदत केली? आता काँग्रेसचा भाजपाला सवाल

Devendra Fadnavis-Nana Patole

मुंबई :- केंद्र सरकारने गेल्या वर्षी केलेल्या आर्थिक पॅकेजच्या घोषणेवरून आता राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसनेही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला. केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्राला कोरोनाच्या कठीण परिस्थितीत किती मदत केली हे फडणवीस यांनी सांगायला हवे, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.

महाराष्ट्र सध्या कोरोना महामारीच्या मोठ्या संकटात आहे. राज्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. राज्य सरकार सर्व पातळ्यांवर मोठ्या ताकदीने काम करत असताना राज्यातील विरोधी पक्ष मात्र बेजबाबदारपणे वागत असल्याची टीका पटोले यांनी केली.

राज्य सरकारला पॅकेज संदर्भात विचारणा करणारे देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांनी आधी नरेंद्र मोदी सरकारकडून महाराष्ट्राला भरीव आर्थिक मदत मिळावी यासाठी काय केले हे सांगावं. मोदींनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचे काय झाले? या २० लाख कोटी रुपयांतून महाराष्ट्राला किती कोटी मिळाले? याची उत्तरे त्यांनी जनतेला द्यावीत. फडणवीस यांची मागणी रास्तच आहे; पण त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे विचारणा करणे अपेक्षित आहे, असं सांगतानाच कदाचित त्यांना दिल्लीत मोदी- शहा गांभीर्याने घेत नाहीत म्हणून ते राज्य सरकारच्या नावावर मोदींना सुचवत असावेत, अशी कोपरखळीही पटोले यांनी लगावली.

ही बातमी पण वाचा : ‘काँग्रेसला डिवचणाऱ्या वाचाळवीर संजय राऊतांना आवरा’, काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांना इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button