राऊतांच्या तोंडामुळे शिवसेनेचे किती नुकसान झाले हे निवडणुकीत कळेल; चंद्रकांत पाटलांची टीका

Chandrakant Patil-Sanjay Raut

मुंबई : भाजपा ईडीकडून दबाव आणत असेल तर महाराष्ट्रात आमचे सरकार आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे आणि भाजपा नेत्यांनी कारवाईला सामोरे जाण्यास तयार राहावे, अशी धमकी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली. याला उत्तर देताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राऊतांवर बोचरी टीका केली – संजय राऊतांच्या तोंडामुळे शिवसेनेचे केवढे नुकसान झाले हे निवडणुकीत कळेल!

शिवसेना (Shivsena) आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी व प्रतिष्ठानांवर सक्तवसुली संचालनालय (ईडी) पथकाने मंगळवारी धाडी टाकल्या. सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचे पथक पोहचले. विहंग सरनाईक यांना ईडीच्या कार्यालयात नेऊन त्यांची दीर्घ काळ चौकशी करण्यात आली. यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत संतापले. धमकी दिली – भाजपा ईडीकडून दबाव आणत असेल तर महाराष्ट्रात आमचे सरकार आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे आणि भाजपा नेत्यांनी कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार राहावे.

यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “खुशाल कारवाईला सुरुवात करा. कोणी संजय राऊतांचे किंवा सरकारचे हात किंवा पाय बांधलेले नाहीत किंवा तोंडदेखील बांधलेले नाही. संजय राऊत यांचे तोंड तर सदासर्वकाळ सुरूच असते. उद्धव ठाकरेदेखील त्यांच्या तोंडाचा पट्टा थांबवू शकत नाहीत. संजय राऊतांच्या तोंडामुळे शिवसेनेचे केवढे नुकसान झाले आहे हे निवडणुकीत कळेल!”

ही बातमी पण वाचा : भाजपावर टीका केल्याशिवाय राऊतांना झोप लागत नसेल! चंद्रकांत पाटलांचा टोमणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER