कोरोनाच्या लसी किती व कधी मिळणार? डॉ. हर्षवर्धन यांचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली :- गेल्या काही दिवसांपासून कोरोना लसीचा (Corona vaccine) तुटवडा निर्माण झाला होता. यामुळे देशभरातील लसीकरण मोहिमेला ब्रेक लागला होता. मात्र, आता पुन्हा नव्या जोमाने लसीकरण होण्याची शक्यता आहे, असे संकेत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिले आहेत. डॉ. हर्षवर्धन (Dr. Harshvardhan) यांनी ८ राज्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी मे महिन्यातच ८ कोटी वॅक्सिनचे डोस उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. तसेच जूनमध्ये ९ कोटी डोस मिळतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोरोना लसींचा साठा हळूहळू उपलब्ध होईल. ज्यांना पहिला डोस मिळालेला आहे. त्यांना प्राधान्याने दुसरा डोस देण्यात येईल. या लोकांचे लसीकरण अर्धवट ठेवून चालणार नाही. तसेच, ३० एप्रिल रोजी राज्यांना येत्या १५ दिवसांत वॅक्सिन मिळणार सांगण्यात आले होते. यानुसार १४ मे रोजी पुढील १५ दिवसांत किती आणि केव्हा वॅक्सिन मिळेल हे सांगण्यात येणार आहे, असेही डॉ. हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले.

कोरोना आकडेवारी
भारतात एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा २ कोटी ३३ लाख ४० हजार ९३८च्या वर आहे. आतापर्यंत २ लाख ५४ हजार १९७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात १ कोटी ९३ लाख ८२ हजार ६४२ रुग्ण बरे झाले आहेत. तर आता ३७ लाख ४ हजार ९९ इतके सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांची संख्या १७ कोटी ५२ लाख ३५ हजार ९९१ इतकी आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

ही बातमी पण वाचा : भारतात लवकरच २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांनाही कोरोनाची लस, ट्रायलला मंजुरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button