एका चेंडूवर फलंदाज कितीवेळा बाद होऊ शकतो?

Dismissal Cricket

एका चेंडूवर फलंदाज कितीवेळा बाद होऊ शकतो? असा प्रश्न विचारला तर तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न झाला. एका चेंडूवर फलंदाज एकदाच बाद होणार ना! एकापेक्षा अधिक वेळा कसे शक्य आहे?

हे तुमचे म्हणणे अगदी बरोबर असले तरी क्रिकेटची दुनिया अजब आहे आणि विश्वास ठेवा, एकाच चेंडूवर फलंदाज दोन वेळा बाद होण्याच्या घटनासुध्दा घडल्या आहेत. आणि हे साध्यासुध्या सामन्यांमध्ये नाही तर कसोटी क्रिकेटमध्ये घडलेय. एकदा नाही तर दोन वेळा असे घडलेय.

1921 मध्ये इंग्लंडसाठी अँडी डूकट नावाचा फलंदाज ऑस्ट्रेलियाविरुध्द खेळत होता. त्यावेळी एका वेगवान चेंडूवर त्याची बॕट तूटली आणि तिचा तुकडा स्टम्पवर जाऊन आदळला. इकडे बॅटीवर चेंडू आदळून त्याचा झेलसुध्दा उडाला आणि तो स्लीपमध्ये झेलला गेला. याप्रकारे एकाच वेळी तो झेलबाद आणि हिट विकेटसुध्दा झाला पण पंचांनी त्याला झेलबाद जाहीर केले.

यानंतर 1950 मध्ये पुन्हा एकदा इंग्लंडचाच फलंदाज एका चेंडूवर दोनवेळा बाद झाला. न्यूझीलंडविरुध्दच्या त्या सामन्यात गिल्बर्ट पार्कहाऊस हा फलंदाजी करत होता. त्यावेळी त्याच्याविरुध्द पायचीतचे जोरदार अपील झाले. दरम्यान पडला लागल्यानंतर चेंडू घरंगळत जाऊन यष्ट्यांवरसुध्दा आदळला आणि एकाचवेळी तो पायचीत आणि त्रिफळाबादसुध्दा झाला. अधिकृत नोंद मात्र तो त्रिफळाबाद झाल्याची आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER