‘मराठा स्ट्राँग मॅन’ची उपमा तुम्हाला अजून किती दिवस द्यायची? उदयनराजेंचा पवारांना टोमणा

Udyanraje Bhosale-Sharad Pawar

सातारा :- वर्षानुवर्षे मराठा समाजावर अन्याय होतो आहे. त्यामुळे इतकी वर्षे सत्तेत असलेल्यांनी मराठा समाजाच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत. मराठा आरक्षणाचा विषय काहींना अगदी व्यवस्थितपणे माहीत आहे. त्यांना अजून किती दिवस मराठ्यांचे कैवारी, ‘मराठा स्ट्राँग मॅन’ उपमा द्यायची? असा टोमणा उदयनराजेंनी शरद पवारांना (Sharad Pawar) मारला.

पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणाबाबत ते म्हणाले – ‘मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. गेली अनेक वर्षे सत्तेत असलेले या प्रश्नाला जबाबदार आहेत. मराठा समाजावर अन्याय करणाऱ्यांनी आता समाजाच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत. देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) सत्तेत असताना आरक्षणाचा मुद्दा रेटून नेला. मग तुम्हाला का जमत नाही? असा प्रश्न करत उदयनराजेंनी शरद पवारांवर टीका केली.

तुम्ही शरद पवारांची भेट घेऊन चर्चा करणार का, या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणालेत, नुसती चर्चा करून काय उपयोग? तोडगा निघणार असेल तर चर्चा करण्यात अर्थ आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेत असलेले नेते आजही सत्तेत आहेत. त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावावा. मराठा समाजामध्ये मोठी नाराजी आहे. सध्या कोरोनाचं संकट आहे. अन्यथा मराठा समाजाने सरकारमधील नेत्यांना घराबाहेर पडू दिले नसते, अशा इशारा त्यांनी दिला. प्रत्येक निवडणुकीत आरक्षणाचे आश्वासन दिले जाते; पण प्रश्न मार्गी लागत नाही. राज्यात मराठा ही निर्णायक जात आहे. विश्वासघात झाल्यास सरकारला जनताच खाली खेचेल. ऍक्शनवर रिऍक्शन झाल्यास जबाबदारी सरकारची असेल, असा इशारा उदयनराजेंनी दिला.

ही बातमी पण वाचा : ही लोकं मोठी नाहीत, केवळ वयाने  मोठी झाली आहेत; उदयनराजेंचा शरद पवारांना टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER