खुर्चीसाठी बाळासाहेबांच्या नावाने किती दिवस पोळ्या भाजणार? : चंद्रकांत पाटीलांची उद्धव ठाकरेंवर टीका

Chandrakant Patil-Uddhav Thackeray

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दसरा मेळाव्यात भाजपावर टीका केली. या टीकेला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी उत्तर दिले – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या नावाने अजून किती दिवस पोळ्या भाजणार? खुर्चीसाठी त्यांनी दिलेल्या हिंदुत्वाच्या शिकवणीचे पालन करणे तुम्ही विसरला आहात.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने अजून किती दिवस पोळ्या भाजणार? खुर्चीसाठी, त्यांनी दिलेल्या हिंदुत्वाच्या शिकवणीचे पालन करणे तुम्ही विसरला आहात, असे उत्तर भाजपपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात भाजपावर सडकून टीका केली. या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी फेसबुकवर सडेतोड उत्तर दिलं आहे

चंद्रकांत पाटील म्हणालेत – काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात देशाच्या सर्वोच्चपदी असणाऱ्या लोकांबद्दल अर्वाच्य भाषेचा उपयोग केला. आपण राज्यप्रमुख आहात, याचा कदाचित तुम्हाला विसर पडला असल्याची प्रचिती काल आली. भाषणात पुन्हा एकदा तुमच्या तथाकथित हिंदुत्वाच्या नावाने गाजावाजा केला. मात्र, सत्तेच्या लालसेपोटी सोयीनुसार तुम्ही हिंदुत्वाची व्याख्या बदलत आहात, हे प्रकर्षणाने जाणवत आहे, असा घणाघात चंद्रकांत पाटलांनी केला.

‘ज्यांच्या स्मारकाठिकाणी तुमचा कालचा कार्यक्रम चालला होता, त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्वदेखील तुमच्या पचनी पडले नाही. संरसंघचालक मोहन भागवत यांच्याच मार्गाने आम्ही चालत आहोत. सरसंघचालकांनी कालच्या भाषणात एक वक्तव्य केले, ‘हिंदू, हिंदुत्व, हिंदुराष्ट्र इसको लेकर भ्रम पैदा करने वाले लोग है’, ते तुमच्यासाठी होते. हिंदुत्वाचा वापर करुन आपली खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी तुमचा हा सगळा आटापिटा सुरू आहे. तुमच्याकडून आम्हाला हिंदुत्व शिकून घेण्याची गरज नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

मी कुटुंबप्रमुख आहे, असे काल तुम्ही म्हणालात. याशिवाय काही दिवसांपूर्वी अतिवृष्टी दौऱ्यावेळी, हे शेतकऱ्यांचे सरकार आहे, असे म्हणाला होतात. जे कुटुंब बळीराजाच्या जीवावर चालते त्यांच्यावर एकही शब्द न बोलता काल जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या सद्यपरिस्थितीचा उल्लेख करने टाळले, असे पाटील म्हणाले

केवळ भाषणबाजीने काहीही होणार नाही

राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवरही चिडीचूप आहेत. केवळ आपलेच ढोल बडविण्यात तुम्ही समाधान मानले. मुख्यमंत्र्यांचे कालचे भाषण अभ्यासशून्य आणि सूड भावनेने प्रेरित होते. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात. ११ कोटींचे कुटुंब तुम्हाला सांभाळायचे आहे. केवळ भाषणबाजी करुन काहीही होणार नाही, असा टोमणा चंद्रकांत पाटील यांनी मारला.

ही बातमी पण वाचा : कर्जबाजारी शेतकरी ‘मातोश्री’बाहेर सहकुटुंब उपोषणाला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER