असे किती आले किती गेले : ना. अनिल परब

Anil Parab

कोल्हापूर : मुंबईने शिवसेनेची (Shivsena) साथ कधीही सोडली नाही. चांगल्या-वाईट प्रसंगात शिवसेना मुंबईसोबत उभी राहिली आहे. हे मुंबईकरांना चांगलंच माहिती आहे. मुंबईच्या जनतेला माहीत आहे की कोणाला साथ द्यायची. किती आले किती गेले, मुंबईकरांचे प्रेम फक्त शिवसेनेवरच आहे, अशा शब्दात परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी भाजपावर आज कोल्हापुरात निशाणा साधला. करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी ते कोल्हापुरात आले होते. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

‘भाजाप येणार, मुंबई घडवणार’ हे घोषवाक्य महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केले आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने तयारी सुरू केली आहे. त्यापार्श्वभूमीवर भाजपाच्या दादरमधील वसंतस्मृती येथील कार्यालयात मुंबई भाजप कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक पार पडली. अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकत आहे. मात्र आगामी काळात महानगरपालिकेवर भगवा असेल, पण तो शिवसेनेचा नसेल. असा निर्धार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

यापार्श्वभूमीवर ना. अनिल परब म्हणाले, खूप जण आले, खूप घोषणा केल्या. मात्र मुंबईने शिवसेनेची साथ कधीही सोडली नाही. चांगल्या वाईट प्रसंगात शिवसेना उभी राहिली आहे. कुणाची साथ द्यायची हे मुंबईच्या जनतेला माहीत आहे. निवडणुका जवळ येत आहेत, त्यामुळे ते स्पष्ट होईल.

फडणवीस यांचाही शिवसेनेला टोला

मेट्रोवरूनही यावेळी फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. मेट्रो कारशेडसाठी समिती तयार केली होती. त्या समितीने हेच सांगितले की मेट्रो तयार होण्यासाठी खूप वेळ लागेल. तरी त्यांनी हा रिपोर्ट दाबून ठेवला. खासगी विकासकाने या जागेवर देखील दावा केला आहे. यापूर्वी या सरकारने लोकांचा पैसा वाया घालवला आहे. मुंबईच्या खाड्या कोणाच्या कार्यकाळात बुजल्या गेल्या आहेत. हे सरकार जनेतची दिशाभूल करत आहे. पहिल्या दिवसापासून त्यांनी मेट्रोला विरोध केला आहे. जनतेला मेट्रो आणि बुलेट ट्रेन हवी असल्याचा दावा देखील फडणवीस यांनी या बैठकीत केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER