कोण म्हणते अर्थव्यवस्था कोसळली? असे असते तर लग्नाचे हॉल व हॉटेल फुल्ल असते का? : रेल्वे राज्यमंत्र्यांचा दावा

रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी

पणजी : नकारात्मक विचारसरणी असलेलेच लोक भारतीय अर्थव्यवस्था कोसळल्याचे बोलत आहे. हे चूक असून जर असे असते तर लग्नाचे हॉल आणि हॉटेल आपल्या क्षमतेइतके भरले असता का? असा सवाल रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी आज उपस्थित केला आहे.

बहुतांश मीडियाकर्मी म्हणत आहे की अर्थव्यवस्था कोसळली आहे. तुम्ही कल्पना करा आणि कुठल्याही हॉटेलमध्ये किंवा लग्नाच्या सभागृहात जाऊन पहा, कुठलेही विमान बघा किंवा रेल्वे बघा दरदिवशी फुल्ल दिसून येत आहे. मग ही तक्रार कुठल्या आधारावर केल्या जात आहे. पणजी येथे तांत्रिक परिषदेत अंगडी बोलत होते.

जेव्हा मागणी जास्त असते तेव्हाच तुम्हाला तिकीट मिळत नाही. जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात मागणी आहे तर मग अर्थव्यवस्था कोसळली कसे म्हणता येईल, असेही अंगडी म्हणाले.

उत्पादन क्षेत्राकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. कारण हेच असे प्रमुख क्षेत्र आहे की जे मागे आहे.

एकच गोष्ट आहे की आम्ही या क्षेत्रात गंभीरपणे आणि कठीण परिश्रम घेत नाही. आम्ही ते केले पाहिजे. आम्ही उत्पादन क्षेत्रात काम केले पाहिजे, असे कर्नाटकमधील भाजप नेते अंगडी म्हणाले.