मेंढ्यांचे नेतृत्व लांडग्याकडे कसे? पदोन्नती आरक्षणावरून गोपीचंद पडळकर यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोमणा

Gopichand Padalkar-Ajit Pawar

मुंबई : मेंढ्यांचे नेतृत्व लांडग्याकडे दिले आहे! आता मेंढ्यांना या लांडग्याकडे संरक्षण मागावे लागेल, अशी अवस्था मागासवर्गीयांची झाली असून अजित पवार (Ajit Pawar) मागासवर्गीय मंत्री समितीचे अध्यक्ष कसे आणि मागास पदोन्नतीबाबत राज्य सरकारची नेमकी भूमिका काय हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे, अशी मागणी भाजपाचे (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली आहे.

पडळकर यांनी पंढरपूरमध्ये बोलताना महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले की, राज्यातील मागासवर्गीय जनतेत निर्माण झालेल्या गोंधळाचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा. काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांनी मागास पदोन्नतीबाबत झालेला निर्णय रद्द केल्याचे ट्विट केले तर लगेच उपमुख्यमंत्री कार्यालयाने हा निर्णय झाल्याचा खुलासा केला. मागासवर्गीय मंत्री उपसमितीच्या अध्यक्षपदी मागासवर्गीय मंत्री असणे अपेक्षित असताना अजित पवार यांना हे पद कसे दिले? मागासवर्गीयांचे दुःख यांना काय माहिती? असा टोमणा मारून पडळकर म्हणालेत, हे म्हणजे मेंढ्यांचे नेतृत्व लांडग्याकडे दिल्यासारखे आहे. या सर्व गोंधळाचा खुलासा स्वतः मुख्यमंत्र्यांनी करून मागासवर्गीय जनतेच्या मनातील संभ्रम दूर करावे, असे आवाहन मी पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button