कसा झाला चंदन तस्कर डाकूचा खात्मा? एका पोलिस ऑफीसरनं लावलं होतं आयुष्य पणाला!

Veerapan

मुनीस्वामी विरप्पन… काही वर्षापुर्वी दक्षिण भारतात गुन्हेगारी या नावाने ओळखली जायची. चंदन-हस्तिदंताची तस्करी, पोलिस अधिकाऱ्यांच्या हत्या, अपहरण असे अनेक गुन्हे त्याच्या नावावर होते. त्याला पकडण्यासाठी 20 कोटी रुपये खर्च ही करण्यात आले होते. तरीही तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. 20 वर्षांपासून शोध असणाऱ्या वीरप्पनचा पोलीसांनी फक्त वीस मिनटात कसा केला खात्मा त्याची ही कहाणी.

त्या स्फोटानं प्रत्येकाच्या कानपर्यंत पोहचलं वीरप्पन हे नाव !

तामिळनाडूच्या जंगली भागात तस्करांचा बंदोबस्त करण्यासाठी पेट्रेलींग पोलिसांची तैनात केली जायची. त्याचे प्रमुख होते लहिम शहिम गोपालकृष्णन. त्याचे बाहू इतके मोठे होते की लोक त्यांना रँबो या नावाने हाक मारत. तसा त्यांचा दरारा ही होता. पण 9 एप्रिल 1993 च्या सकाळी कोथालपूर गावात वीरप्पनने बँनर लावून रँबोसाठी अश्लील शिव्या लिहल्या होत्या. दम असेल तर मला पकडून दाखव असं ओपन चँलेज वीरप्पनने दिलं.

कोणत्याही परिस्थीत वीरप्पनला बेड्या ठोकयच्याच या निर्धारान गोपालकृष्णन निघाले. पलार पुलावर त्यांची जीप खराब झाल्याने पुढचा प्रवास त्यांनी बसने सुरू केला. त्यांच्यासोबत 4 पोलीस कर्मचारी 2 वन गार्ड आणि काही खबरी देखील होते.

वेगाने येणाऱ्या बसच्या आवाजाने वीरप्पनचे साथीदार चिंतेत सापडले गोपालकृष्णन जीपने येतील हे गृहीत धरून त्यांनी कट रचला होता. पण ठरल्याप्रमाणे बस निश्चित स्थानावर पोहचताच वीरप्पने शिट्टी वाजवली आणि त्याच्या साथीदाराने विस्फोटाला जोडलेली तार कारच्या बॅटरीला जोडली.

भयानक विस्फोट झाला, 3 हजार सेल्सीयस इतकी उष्णता या स्फोटनं निर्माण केली. बस हवेत फेकली गेली. आगीत जळणारी बस वितळता धातू, काचांचे तुकडे आणि रक्तामासाच्या ढिगाऱ्यासह ताशी 100 किमीच्या वेगाने जमिनीनवर आदळली. जळत्या बसच्या आगीच्या धुरासोबतच वीरप्पन नावाच्या दहशतीनं दक्षिणभारताचं आकाश व्यापलं.

आणि स्वतःच्या नवजात मुलीचं रडण वीरप्पनने कायम स्वरूपी शांत केलं

गुन्हेगारी जगातील अनेक क्रुर किस्से तुम्ही ऐकली असतील पण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्याच मुलीचा बळी एखाद्या कुख्यात डाकून ने दिला असेल हे तुम्ही कधी ऐकलं नसेल.

वीरप्पनचा खात्मा करण्यासाठी बनवलेल्या स्पेशल टास्क फोर्सचे प्रमुख विजय कुमार सांगतात की “नव्वदच्या दशकात वीरप्पनची गँगमध्ये 100 हून अधिक लोक सामील होते. आणि तामिळनाडू पोलीस वीरप्पनसाठी जंग जंग पछाडत होती अशातच 1993 मध्ये वीरप्पनच्या पत्नीने मुलीला जन्म दिला. रात्रीच्या वेळी मुलीच्या रडण्याचा आवाड 2 ते 3 किलोमीटरपर्यंत ऐकायला जावू शकतो. मुलीच्या रडण्यामुळे वीरप्पन पोलीसांच्या ताब्यात येता येता वाचला होता त्यामुळे वीरप्पनने स्वतःच्या नवजात मुलीचा आवाज कायम स्वरूपी बंद केला.” वीरप्पनचा पाठलाग करणाऱ्या कर्नाटक पोलिसांना त्या नवजात मुलीचे शव ही मिळाले होते.”

वीरप्पनला पहिल्यांदा अटक करणाऱ्या अधिकाऱ्याला त्याने असं संपवल

वीरप्पन गुन्हेगारी सोडणार आहे त्याल सरेंडर करायचं आहे असा निरोप घेवू स्वतः वीरप्पनचा भाऊ अर्जूनन श्रीनिवासन यांच्या कार्यलायत पोहचला. वीरप्पनला सर्वात पहिल्या बेड्या याच श्रीनिवासन यांनी ठोकल्या होत्या.

“नामदेल्ही या ठिकाणी आपण पोहोचलो की तो अर्ध्या रस्त्यात आपल्याला भेटेल आणि तिथेच तो सरेंडर करेल” हा निरोप ऐकताच एक टीमसोबत घेवून श्रीनिवासन अर्जुनन सोबत निघाले. पण वाटेत त्यांच्या टीममधील एकएक जण त्यांची साथ सोडून परत फिरत असल्याचे त्यांना जाणवले.

काही कळायच्या आत वीरप्पन त्यांच्या समोर आला. आणि या घटनेनंतर श्रीनीवासन यांना परत कोणीच पाहिलं नाही. त्याचं शीर कापून वीरप्पनच्या टोळीन फुटबॉल खेळला होता असं ही स्थानिक सांगतात.

विजय कुमारांचं मिशन विजय

सरत्या वर्षांसोबत वीरप्पनच्या गुन्हेगारीकृत्यांचा आलेख चढताच राहिला. 2000 मध्ये त्याने दक्षिण भारतातील त्यावेळचे प्रसिद्ध अभिनेते राजकुमार यांचं अपहरण केलं . तब्बल 100 दिवस त्यांना कैदत ठेवत अनेक मागण्या मान्य करायला लावल्या. कर्नाटक आणि तमिळना़डू या दोन्ही राज्यसरकारांना अक्षरशः गुडघे टेकण्यास भाग पा़डलं.

या घटनेनंतर तामिळनाडू सरकारने वीरप्पनच्या खात्मा करण्याचा निर्धार केला. तत्कालीन दिवंगत मुख्यमंत्री जयललीता यांनी स्पेशल टास्क फोर्सची स्थानपना करून पोलिस अधिकारी विजय कुमार यांची या एसटीएफचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली, यात 752 पोलीस कर्मचारी सहभागी होते. 1993 मध्ये वीरप्पनला पकडण्याचा अपयशी प्रयत्न विजय कुमार यांनी केला होता. त्यामुळे वीरप्पनचा खात्मा करण हा विजय कुमारांसाठी प्रतिष्ठेचा विषय होता.

यावेळी मात्र विजय कुमार यांनी पुर्ण दक्षता घेतली. वीरप्पनला व्हिडीओ बनवून टेप्स पाठवायची हौस होती. त्यातील एका व्हिडीओत वीरप्पनला वाचालया त्रास होत असल्याची बारीक बार विजय कुमारांच्या लक्षात आली. वीरप्पनच्या मागावर असताना मोठी टीम असल्याने या टीमच्या बारीक हलचालींवर स्थानिक लोक नजर ठेवून वीरप्पनला खबर देत असतं. यासाठी एसटीएफला सहा सहा पोलिसांच्या तुकडीत विभागले गेले.

2004 ला वीरप्पनला जंगलाबाहेर काढण्यासाठी एसटीफनने युक्ती लढवली. डोळ्यांच्या उपचारासाठी जंगलाबाहेर येण्यासाठी एक अँब्युलेंस पाठवण्यात आली. ज्यात ड्रयव्हर आणि वैद्यकीय कर्मचारी बनवून एसटीएफच्या दोन कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आलं. वीरप्पनला घेवून अँब्युलेंस निघाली. ओळख लपवण्यासाठी वीरप्पनने झुपकेदार मिशांना कात्री लावली होती.

अँब्युलेंस नियोजित ठिकाणी पोहचल्यावर पुढे बसलेल्या एसटीएफचे दोन्ही जवान खाली उतरले. स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करण्यास वीरप्पनला सागंण्यात आलं पण बंद अँब्युलेंसच्या काचेतून वीरप्पनच्या साथीदारांनी पहिल्यांदा फायरिंग केलं. त्यानंतर एसटीफने चारी बाजूने अँब्युलेन्सवर फायरिंग केली. तब्बल वीस मिनटं चाललेल्या या चकमकीत 338 राऊंड गोळ्या झाडल्या गेल्या. “अँब्युलेंसमधून फायरिंग बंद झालं. अँब्युलेंसच दार उघडून पाहिलं तर बिगर मिश्शांचा 52 वर्षाचा वीरप्पन अगदी 25 वर्षांचा दिसत होता, त्याच्या उजव्या डोळ्याला गोळी लागली होती तो अखेरचं श्वास मोजत होता ते दृश्य आजही माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं” असं, एसटीएफ प्रमुख विजय कुमार सांगातात.

विजय कुमार यांनी जयललिता यांना फोन लावून ही बातमी दिली. जयललिता म्हणाल्या “मुख्यमंत्री झाल्यापासून मी ऐकलेली सर्वात आनंदाची बातमी आहे, अभिनंदन”

वीरप्पनचं शवविच्छेदनासाठी नेण्यात आलं एसटीएफने विजय कुमार यांना खांद्यावर उचलून एसटीएफच्या जवानांनी जल्लोष केला. पुढे जयललितांनी विजय कुमार यांना पोलीस शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER