हजारो किलोमीटरवर बनवला जाणारा समोसा कसा बनला भारतीयांचा लाडका?

भारतात समोसा (samosa) इताका खाल्ला जातो की, जणू समोसा हा भारताचाच खाद्यपदार्थ असल्याची अनेकांची धारणा बनलीये. पण ते खरं नाही. समोसा हा विदेशी खाद्य पदार्थ  (Foreign dish) आहे.

इसवी सन १० व्या शतकाच्या सुमारास मध्यपूर्व देशांमध्ये समोसा जन्मला. जेव्हा मध्यपूर्वी देश विकसीत होत होते तेव्हा समोसा बनवण्याच्या प्रक्रियेचा शोध लागला. इराकमध्ये याचा शोध लागल्याचे उल्लेख आहेत.

दहाव्या शतकात समोसा आजच्या सारखा नव्हता. ती बनवण्याची पद्धत वेगळी होती. रात्रीच्या अंधारात जेव्हा लोक शेकोटी पेटवून बसवत तेव्हा समोसा बनवायचे. आता समोसा तेलात तळला जातो आधी समोसा आगीत भाजला जायचा. त्यावेळी लांबवरच्या प्रवासाला जाण्यासाठी समोसा बनवून सोबत ठेवला जायचा. फारसी पुस्तकांमध्ये याचे अनेक उल्लेख आढळतो.

आधी पुस्तकात समोस्याला ‘संबोसग’ नावाने ओळखले जायचे. आधी याचा समोस्याचा आकार ही आत्ताप्रमाणच त्रिकोणी होता. हे समोसे थैलीत भरुन लोक हजारो किलोमीटरच्या प्रवासाला जायचे. ज्या प्रदेशात हे लोक समोसे घेवून गेले तिथं समोसा प्रसिद्ध झाला. तिथलाच होवून गेला.

आणि भारतात आला समोसा

समोसा आशिया, आफ्रिकेच्या विविध देशात पसरत होता. १३ व्या आणि १४व्या शतकासोबत दिल्लीवर मोहम्मद बिन तुगलक राजा होता. त्याला खाण्याची दांडगी हौस होती. वेगवेगळ्या देशातले खाद्य पदार्थ खायला त्याला आवडायचं. त्याच्यासाठी जेवण बनवायला विविध देशातून आचारी आणले होते. इराणमधून आलेल्या आचाऱ्यांनी त्याच्यासाठी समोसे बनवले आणि तेव्हापासून भारतात समोसा आला.

तेव्हापासून भारतात समोसा प्रसिद्ध झाला. आणि सामान्य भारतीयांच्या व्यंजनाचा हिस्सा बनला.

आधी समोस्यात मांस वापरलं जायचं

वेळेसोबत समोसाही बदलला. आज लोक समोस्यामध्ये बटाट्याची भाजी खातात आधी त्यात मांस वापरलं जायच. मांस, तूप आणि कांदा वापरला जायचा. शाकाहारी लोकांना समोसा खाता येत नव्हतं. अमीर खुसरो या प्रसिद्ध कवीनं देखील तेव्हा समोस्याबद्दल लिहलं.

१४व्या शतकात इब्न बुताने त्याच्या पुस्तकात या खाद्यपदार्थाचा उल्लेख केला. शाही भोजनात समोसा नावाची गोष्ट त्याला खायला दिली. त्यात मटण, काजू, बदाम, पिस्ता आणि मसाले होते. फक्त शाही लोकच समोसा खात होते. शाकाहारी लोकांच्या आहारात समोस्याचा समावेश नव्हता.

सामान्य लोकांपर्यंत समोसा तोपर्यंत पोहचला नव्हता. फक्त राजघराणी आणि शाही मेजवाण्यातच समोसा बनवला जायचा. त्यात वापरले जाणारे घटक सुद्धा सामान्यांच्या खिशाला परवडणारे नव्हते. आणि ज्या लोकांना परवडायचे ते लोक मंसाहार करत नव्हते. यावर उपाय म्हणून सामान्यांच्या आहार सवयी व घटक वापरुन समोसा बनवणे गरजेचे होते.

उत्तरप्रदेशात पहिल्यांदा बटाट्यांचा समोसा बनल्याच मानलं जातं. इथून समोसा घराघरात पोहचला. शाही पकवान मानला जाणारा समोसा सामान्यांच्या दैनंदिन खाण्याचा हिस्सा बनला,

जगभरात आहे समोसा प्रसिद्ध

आज इतक्या वर्षानंतरही समोसा चवीने खाल्ला जातो. समोस्यासोबत अनेक प्रयोग करण्यात आले. देशभरात समोस्याचे विविध प्रकार पहायला मिळतात. हैद्राबादमध्ये आजही मांसाहारी समोसा बनवतात तर दक्षिणेच्या इतर राज्यात समोस्यात वेगवेगळ्या भाज्या वापरल्या जातात.

फक्त भारतातच नाही तर परदेशातही समोसा मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. इस्त्राईल, पोर्तूगीज, ब्राझील आणि अरब राष्ट्रांमधले लोक समोसा आवडीने खातात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER