कोरोना लाट ओसरण्याचे श्रेय महापालिकेलाच कसे ? काँग्रेसचा फडणवीसांना सवाल

Devendra Fadnavis - Gopal Tiwari

पुणे :- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुण्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात आणण्याचे श्रेय महापालिका प्रशासनाला दिले आहे. महापालिका प्रशासनाने राबविलेल्या व्यापक स्वरूपात लसीकरण मोहिमेमुळे हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस (Congress) प्रवक्ते गोपाळ तिवारी (Gopal Tiwari) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

पुण्यात फेब्रुवारी महिन्यात कोरोना (Corona) बाधितांच्या संख्येत वाढ झाली. मार्च, एप्रिल आणि मेच्या सुरुवातीपर्यंत कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भाव दिसला. मात्र, गेल्या आठवड्यापासून रुग्णांच्या संख्येत घट आढळून आली आहे. आता यावरून श्रेयवादाचा नवीन वाद पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

काँग्रेस प्रवक्ते तिवारी म्हणाले की, “पुण्यात कोरोना परिस्थिती आटोक्यात येत आहे. ही बाब खरी असली तरी याचे पूर्ण श्रेय फक्त महापालिकेलाच नाही तर राज्य सरकार, प्रशासन आणि प्रत्येक पुणेकराने दाखविलेल्या संयमामुळे शक्य होत आहे. त्यामुळे यांनादेखील कोरोना लाट कमी होण्याचे श्रेय निश्चितच द्यावे लागेल. या दुसऱ्या लाटेच्या कालावधीत महापालिकेसह प्रत्येक नागरिकाने आपले योगदान दिले आहे. या काळात काही कुटुंबीयांवर जवळचे व्यक्ती गमावल्याने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशा परिस्थितीत फक्त महापालिकेला श्रेय दिले गेले तर ते इतर घटकांचा अपमान केल्यासारखे होईल.”

कोरोना प्रादुर्भाव कमी होत असताना व्यापाऱ्यांकडून लॉकडाऊन (Lockdown) निर्बंध कमी करून दुकाने उघडण्याची मागणी होणे साहजिक आहे. त्यामुळे इथले उद्योग सुरू होणे गरजेचे आहे. मात्र, उद्योग धंद्यांना परवानगी देताना संसर्ग वाढणार नाही, याची दक्षता घेणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे मत तिवारी यांनी व्यक्त केले.

ही बातमी पण वाचा : सेलिब्रिटींसाठी वेळ, पण संभाजीराजेंसाठी नाही; काँग्रेस नेत्यांची पंतप्रधानांवर टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button