वरिष्ठ अधिकाऱ्यांना डावलून सचिन वाझेंकडे गुप्तचर विभागाचं प्रमुखपदं कस?

Sachin Waze

मुंबई :- मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात (Mansukh Hiren death case) मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) हे संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हिरेन यांच्या पत्नीचा जबाब वाचून दाखवत, मनसुख हिरेन यांची हत्या सचिन वाझेंनी केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे सचिन वाझेंना तात्काळ अटक करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. दुसरीकडे सचिन वाझे यांना महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारकडून स्पेशल ट्रिटमेंट मिळतेय का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण बडतर्फ झाल्यानंतर तब्बल 12 वर्षांनी सचिन वाझे मुंबई पोलीस दलात दाखल झाले. पोलीस दलात दाखल होताच, त्यांची नियुक्ती थेट क्राईम ब्रांचच्या गुप्तचर विभागाचे प्रमुखपदी करण्यात आल्याने विरोधकांनी नियम तोडल्याचा आरोप केला आहे.

गुप्तचर विभागाच्या प्रमुखपदी आतपर्यंत केवळ सिनीअर पीआय म्हणजेच वरिष्ठ पोलीस निरिक्षकांचीच नियुक्ती करण्यात आली होती. मात्र सचिन वाझे परत येताच पहिल्यांदाच या पदावर त्यापेक्षा खालच्या पोस्टचे म्हणजे सहाय्यक पोलीस निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षकापेक्षा पोलीस निरीक्षक आणि मग सिनीअर पीआय म्हणजे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असा वरिष्ठांचा क्रम आहे. मात्र सचिन वाझे यांनी पोलीस निरीक्षक आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना मागे टाकल्याचा आरोप होत आहे.

एक तर १२ वर्षे पोलीस दलाच्या बाहेर, दुसरं म्हणजे ज्युनिअर असूनही क्राईम ब्रान्च गुप्तचर विभागाचे प्रमुख, असे सर्व नियम वाझेंसाठी पायदळी तुडवल्याचा आरोप आता होत आहे. सिनीअर पीआयपेक्षा खूप ज्युनिअर पद असूनही त्यांना क्राईम ब्रान्च गुप्तचर विभागाचे प्रमुख करणे योग्य नसल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER