जाणून घ्या, सीएसके 2028 मध्ये सलग तीन सामने का हरणार?

Chennai Super Kings

आयपीएलमध्ये (IPL) बलाढ्य मानल्या जाणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज(Chennai Super Kings – CSK) संघाची अवस्था यंदा खराब आहे. लागोपाठ तीन सामने ते हरले आहे आणि आयपीएलच्या 13 वर्षांच्या इतिहासात चौथ्यांदा असं घडलंय.

सीएसकेने लागोपाठ तीन सामने हरण्याचे वर्ष होते 2008, 2010, 2014 आणि आता 2020. ह्या अपयशी कामगिरीतील वर्षांचे अंतर पाहिले तर ते क्रमाने 2, 4 आणि 6 वर्षांचे आहे. या हिशेबाने दोनच्या पाढ्यात आता 6 च्या पुढे 8 म्हणून सीएसकेचा संघ आता पुढे 2028 मध्ये सलग तीन सामने हरेल असे गणित आता क्रिकेटप्रेमी मांडू लागले आहेत. ते होईल की नाही हे काळच ठरवेल पण आतापर्यंत सीएसकेचा संघ लागोपाठ तीन सामने कसे व कोणते हरला ते बघूया

2008- दिल्ली डेअरडेविल्स, राजस्थान रॉयल्स आणि डेक्कन चार्जर्स

2010- रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स

2014- रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद

2020- राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद.

यात विशेष बाब ही की 2008 मध्ये ते ज्या संघांकडून हरले होते त्याच संघांकडून यंदासुध्दा हरले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER