‘एकीकडे पवारांना म्हणून दुसरीकडे अशोभनीय वक्तव्य करणे कस जमत’? – रुपाली चाकणकर

rupali chakankar - Chitra Wagh - Maharastra Today
rupali chakankar - Chitra Wagh - Maharastra Today

मुंबई : ‘एकीकडे पत्रकार परिषदेत मी पवार साहेबांच्या तालमीत वाढले, ते माझे बाप आहेत असं ठामपणे म्हणायचं आणि दुसरीकडे अशोभनीय विधान करायचा दुटप्पीपणा कसा जमत असेल? असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादीच्या (NCP) महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर निशाणा साधला आहे. गेल्या दोन दिवसांपासून दोन्ही नेत्यांमध्ये सोशल मीडियावर वॉर रंगले आहे.

“राजकीय उदरनिर्वाहासाठी बेताल वक्तव्य करणाऱ्या काही लोकांना नवीन वसुलीमंत्री कोण याची काळजी लागली होती. एकीकडे मी पवार साहेबांच्या तालमीत वाढले, ते माझे बाप आहेत म्हणायचं आणि दुसरीकडे असं अशोभनीय वक्तव्य करायचा दुटप्पीपणा कसा जमत असेल? कर्तव्यनिष्ठ ही दिलीपराव वळसे पाटीलसाहेबांची ओळख आहे. कारवाई होऊ नये म्हणून पक्ष बदलणाऱ्या लाचखोरांनी जरी त्यांना आज शुभेच्छा दिल्या असल्या तरी ते अशा गुन्हेगारांना सोडणार नाहीत. गृहमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल साहेबांचे मनपूर्वक अभिनंदन.” अशा शब्दात नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना शुभेच्छा देताना चाकणकरांनी चित्रा वाघ यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button