कोणाचाही आशीर्वाद नसताना सचिन वाझे इतके सगळ कसे करू शकतो ? रिबेरोंनी व्यक्त केला संशय

Maharashtra Today

मुंबई : सचिन वाझे ( Sachin vaze) थेट पोलीस आयुक्तांना रिपोर्ट करत होते. मला वाटते त्यांनीदेखील आरोपांमधील वाटा घ्यायला हवा. कोणाचाही आशीर्वाद नसताना सचिन वाझे इतके सगळे कसे काय करु शकतात? ते फक्त एसीपी आहेत, जी खूपच छोटी रँक आहे, असे सांगून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो (Julio Ribeiro) यांनी या प्रकरणात इतरांचाही मोठा हात आहे,असे सूचित केले.

… तरी चौकशीस नकार दिला असता

सचिन वाझे प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh)यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी ज्युलिओ रिबेरो यांनी करावी, अशी सूचना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केली होती. ही सूचना अमान्य करताना रिबेरो म्हणालेत, माझे वय ९२ वर्ष असून, अशा चौकशांसाठी मी समर्थ नाही. मात्र, समर्थ असतो तरी चौकशीस मी नकार दिला असता. आयपीएस अधिकाऱ्यांची नावे खंडणी प्रकरणात संशयित म्हणून येत असतील तर आपल्या सर्वांच्या माना शरमेने खाली गेल्या पाहिजेत.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणालेत की, अशा गोंधळलेल्या परिस्थितीला मी स्पर्श करु इच्छित नाही. ही अत्यंत अवघड परिस्थिती असून या सगळ्याचा शेवट कुठे घेऊन जाईल हे मला माहिती नाही. त्यामुळे राजकारण्यांनीच यावर तोडगा काढून परिस्थिती पूर्ववत करणे योग्य आहे.

ज्युलिओ रिबेरो १९८२ ते १९८६ दरम्यान मुंबई पोलीस प्रमुख होते. यानंतर ते गुजरात आणि पंजाबमध्ये आयुक्त होते. माझ्या कार्यकाळात अशी कोणतीही गोष्ट घडली नव्हती असे ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER