पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकरी विरोधी कसे असतील? या अभिनेत्रीने केला प्रश्न उपस्थित

Hema Malini - PM Narendra Modi

केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, त्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, त्यांना त्यांचा माल जो जास्त दाम देईल त्याला विकण्याची संधी मिळावी यासाठी तीन कृषी विधेयके तयार केली आहेत. परंतु ही विधेयके मंजूर नसल्याने सांगत ती मागे घ्यावी यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन (Farmers Protest) सुरु केले आहे. गेल्या 75 दिवसांपासून हे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात शेतकरी नसून शेतकऱ्यांच्या आडून राजकारण करणारे आले आहेत असा आरोप सत्ताधारी पक्षातर्फे केला जात आहे. सरकारच्या बाजूने अनेक लोक पुढे आले असून ते केंद्र सरकारचे बरोबर असल्याचे म्हणत आहेत. एका अभिने्रीनेही पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करीत असून ते शेतकरी विरोधी कसे असू शकतील असा प्रश्न विरोधकांना केला आहे.

प्रख्यात अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) आणि तिचा सावत्र मुलगा सनी देओल (Sunny Deol) भाजपकडून खासदार म्हणून लोकसभेत निवडून गेलेले आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्पावर चर्चा सुरु असताना शेतकरी आंदोलनाचा विषयही चर्चेला येत आहे. लोकसभेत यावर चर्चा सुरु असताना खासदार हेमा मालिनी यांनी पंतप्रधानांच्या समर्थनार्थ भाषण केले.यावर बोलताना हेमा मालिनी म्हणाल्या, ‘भारताला आत्मनिर्भर करणारा हा अर्थसंकल्प आहे, भारताला बदलणारा हा अर्थसंकल्प आहे. संसदेच्या इतिहासात प्रथमच आरोग्य विभागाच्या तरतुदींमध्ये 137 टक्क्यांनी वाढ करण्यात आलेली आहे. गेल्या साडे सहा वर्षात गरीबांसाठी सरकारने अनेक योजना आणल्या ज्यामुळे त्यांचे जीवन सुसह्य झाले आहे. यासोबतच केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे जीवन सुखकर व्हावे म्हणूनही अनेक योजना आणल्या आहेत. अनेक नियम, कायदे तयार केले आहे. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहे. सरकारने तयार केलेल्या कृषी कायद्यात काही त्रुटी असतील तर त्या चर्चा करून सुधारता येतील परंतु त्यांची ही गोष्ट कोणीही ऐकायला तयार नाही.जो पंतप्रधान शेतकऱ्यांसाठी सतत काम करीत आहे असे सांगत तो शेतकरी विरोधी कसा असू शकेल असा प्रश्न विरोधकांना केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER