फक्त ४० जागा मिळवणारे नीतीश कुमार मुख्यमंत्री कसे होऊ शकतात? – राजद

Manoj Jha & Nitish KMumar

पाटणा : अवघ्या ४० जागा मिळाल्या असताना नीतीश कुमार (Nitish Kumar) बिहारचे (Bihar) मुख्यमंत्री कसे होऊ शकतात? असा प्रश्न राजदचे नेते मनोजकुमार झा (Manoj Kumar Jha) यांनी विचारला आहे. लोकांनी दिलेला कौल हा नीतीश कुमार यांच्या विरोधात आहे. त्यांनी याबाबत आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

बिहारची जनता लवकरच दुसरा पर्याय शोधू शकते. कदाचित आठवडाभरात, १० दिवसांत किंवा महिनाभरात बदल घडेल, असे झा यांनी म्हटले आहे. बिहार विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएने २४३ पैकी १२५ जागांवर विजय मिळवत बहुमताचा आकडा गाठला आहे. महाआघाडीला ११० जागा मिळाल्या आहेत. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली कडवी झुंज देणारा राष्ट्रीय जनता दल (राजद) ७५ जागा मिळवून सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. त्यापाठोपाठ ७४ जागा मिळवून भाजपाने दुसरे स्थान पटकवले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER