“ममता बॅनर्जींचे कसले गुणगान गाताय, दीदींना हिंदूंचा आसरा घ्यावाच लागला” : निलेश राणे

Nilesh Rane - Mamata Banerjee - Maharashtra Today

मुंबई : आज संपूर्ण देशाचे लक्ष विधानसभा निवळणुकीत लागले आहे. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत भाजपाला (BJP) पराभूत करत ममता बॅनर्जीं (Mamata Banerjee) यांनी मैदान मारले आहे. मात्र, महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे (NCP) उमेदवार भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांचा भाजप उमेदवार समाधान अवताडे (Samadhan Autade) यांनी पराभव झाला आहे. या विजयानंतर भाजपचे नेते निलेश राणे यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) नेत्यांवर टीका केली आहे.

यासंदर्भात निलेश राणे यांनी ट्विटद्वारे महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. या ट्विटमध्ये निलेश राणे म्हणाले की, “त्या अजित पवारांना शोधा. ते नेहमी सांगतात तीन पक्ष एकत्र आल्यावर कोणाची मायची अवलाद हरवू शकत नाही. तुमच्या घरात शिरून भाजपाने तुम्हाला ठोकलय. ममता बॅनर्जींचे कसले गुणगान गाताय?? बंगालमध्ये तुमच्या तीन पक्षाच्या नावाचा कुत्रासुद्धा नाही. संजय राऊत तुम्ही स्वतः कधी निवडून येणार ते सांगा?” असा सवाल निलेश राणे यांनी केला.

बंगालच्या निकालांसंदर्भात निलेश राणे (Nilesh Rane) यांनी आणखी एक ट्विट केले आहे. “ममता बॅनर्जी जिंकल्या खऱ्या पण कशा जिंकल्या हे विसरून चालणार नाही. कृष्णकथा आणि चंडीपाठ व्यासपीठावर त्यांना म्हणावे लागले. ममतादीदींना हिंदूंचा आसरा घ्यावाच लागला. लेफ्ट वाल्यांशी किंवा काँग्रेसशी लढताना त्यांना कधीही हिंदू आठवला नव्हता, तो पहिल्यांदा आठवला. हे काय कमी आहे.” असेही निलेश राणे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button