कोण कसे गाठू शकते प्ले आॕफ फेरी? चेन्नई करु शकते खेळखंडोबा

CSK

आयपीएल 2020 चे साखळी सामने अंतिम टप्प्यात आहेत. प्रत्यैक संघाचे 12 सामने खेळून झाले असून फक्त दोन दोनच सामने बाकी आहेत मात्र अजुनही मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) वगळता इतर संघांची स्थिती नेमकी काय असेल ते सांगता येत नाही. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) 16 गुणांसह अव्वल स्थानी आहे आणि त्यांचा प्ले आॕफमधला प्रवेश जवळपास निश्चित मानला जातोय. दुसरीकडे चेन्नईच्या संघाचे आव्हान संपलेले आहे. अशा स्थितीत प्ले आॕफच्या उरलेल्या तीन जागांसाठीआता सहा संघात स्पर्धा आहे. विरोधाभास हा की जो संघ यंदा सर्वात आधी बाद झाला आहे तो यापूर्वी कधीच प्ले आॕफच्या बाद झालेला नव्हता. सद्यस्थितीत 3 जागांसाठी सहा संघ स्पर्धेत असल्याने नेट रनरेट फार महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे.

आता जे सामने बाकी आहेत ते असे..

  • चेन्नई वि. केकेआर
  • किंग्ज इलेव्हन वि. राजस्थान
  • दिल्ली वि. मुंबई
  • बंगलोर वि. हैदराबाद
  • चेन्नई वि. पंजाब
  • कोलकाता वि. राजस्थान
  • दिल्ली वि. बंगलोर
  • हैदराबाद वि. मुंबई

मुंबई इतर संघांपेक्षा दोन गुणांनी पुढे आहे. त्यांचा नेट रनरेटही 1.186 असा चांगला आहे. त्यामुळे मुंबईचे प्ले आॕफमधील स्थान सुरक्षीत मानता येईल. दिल्ली किंवा हैदराबादवर विजय मिळवला तर प्रश्नच नाही कारण त्या स्थितीत इतर संघांपैकी फक्त एकालाच 18 गूण करता येणार आहेत.

सात विजय नोंदवलेल्या राॕयल चॕलेंजर्स बंगलोर (RCB) व हैदराबादशी सामने बाकी आहेत. 2016 नंतर ते पहिल्यांदाच स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात पोहोचण्याची शक्यता आहे. त्यांनी एक सामना जिंकला आणि एक गमावला तर पाच संघांचे 16 – 16 गूण होण्याची स्थिती येऊ शकते. तेंव्हा नेट रनरेट अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.

दिल्ली कॕपिटल्सने (Delhi Capitals) चांगल्या सुरुवातीनंतर लागोपाठ तीन सामने गमावले आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतःलाच अडचणीत आणले आहे. शिवाय त्यांचे शिल्लक सामने मुंबई व बंगलोर या बलाढ्य संघांशी आहेत. त्यात बंगलोरविरुध्दचा सामना त्यांचे भवितव्य ठरवेल असा अंदाज आहे. 14 गूण असणाऱ्या दिल्लीला नेटरनरेटचा फरक मारक ठरू शकतो.

सलग पाच सामने जिंकून जबरदस्त मुसंडी मारलेल्या पंजाबचे 12 गूण आहेत. सध्या ते फाॕर्ममध्ये आहेत आणि गूणतालिकेत तळाला असलेल्या चेन्नई व राजस्थान संघांशी सामने बाकी अशी त्यांची विन-विन स्थिती आहे. फक्त नेट रन रेट चांगला नसणे हीच एक समस्या त्यांच्यासमोर आहे. मात्र एक विजय व एक पराभव त्यांना अडचणीत आणू शकतो. मात्र दोन्ही सामने गमावले तर किंग्ज इलेव्हनचे आव्हान संपणार आहे.

पंजाबप्रमाणेच कोलकाताचे सामने राजस्थान व चेन्नईविरुध्दच बाकी आहेत. केकेआरचे 12 गूण आहेत. त्यांना नेट रनरेट बराच सुधारावा लागणार आहे. किंग्ज इलेव्हनचे सामने संपल्यानंतर केकेआरचा शेवटचा सामना आहे. त्यामुळे त्यांना नेमके काय करायचे आहे हे स्पष्ट होणार आहे.

राजस्थान राॕयल्सचे (Rajasthan Royals) 10 गूण आहेत. त्यांचे पंजाब व कोलकाताविरुध्द सामने आहेत. राजस्थानने हे दोन्ही सामने जिंकले तर केकेआर व पंजाबचे कमाल 14 गूणच होतील. राजस्थानचेही 14 च असतील, आणि नेट रनरेट महत्त्वाची भूमिका पार पाडेल मात्र राजस्थानला एकही पराभव परवडणारा नाही.जर किंग्ज इलेव्हन व कोलकाता त्यांचे दोन्ही सामने हरले आणि हैदराबादने एक सामना गमावला तर राजस्थानला नेट रनरेटचा आधार लागणार नाही.

सनरायजर्सचे 10 गूण असुन त्यांना बंगलोर व मुंबईचा सामना करायचा आहे. त्यांचा रनरेट राजस्थानपेक्षा चांगला आहे पण दोन्ही सामने त्यांना जिंकावेच लागणार आहेत. त्यांनी जर बंगलोरला मात दिली तर आधीच नेटरनरेट चांगला असल्याने मुंबईविरुध्द त्यांना त्याचा फायदा होईल.

चेन्नईचा संघ आधीच बाद झालेला आहे पण त्यांचा एकही विजय सर्वच संघांचे समीकरण बदलू शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER