‘कोणताही राष्ट्रीय पक्ष दीर्घकाळ विनाअध्यक्ष कसा काम करू शकतो’ – कपिल सिब्बल

Kapil Sibal

नवी दिल्ली :- बिहारमधील काँग्रेसच्या खराब कामगिरीनंतर आता कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी पुन्हा एकदा काँग्रेसच्या नेतृत्वावर टीकास्त्र डागलं आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आपल्याला अध्यक्ष बनायचे नाही, तसेच काँग्रेस अध्यक्ष गांधी कुटुंबीयांपैकी नसावा असेही ते म्हणाले होते. त्याला आता दीड वर्षाचा काळ लोटलाय. एखादा राष्ट्रीय पक्ष इतक्या दीर्घकाळ कसे काय काम करू शकतो, असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला आहे.

काँग्रेसच्या (Congress) संघटनात्मक बांधणीबाबत आम्ही ऑगस्ट महिन्यात पत्र लिहिले होते. मात्र कोणीही आमच्याशी चर्चा केली नाही. दीड वर्षानंतरही पक्षाला अध्यक्ष नाही. एखाद्या राष्ट्रीय पक्षासाठी ही कठीण परिस्थिती आहे. मी कोणाच्याही क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही, असेही सिब्बल म्हणाले.

आम्ही २०१४ ची निवडणूक हरलो, काही झाले नाही. त्यानंतर आम्ही २०१९ मध्ये पराभूत झालो. त्यानंतर कोणता मोठा बदल झाला नाही. निवडणुका होत राहतात, मात्र काँग्रेसने कमीत कमी आपल्या भविष्याच्या मार्गावर तरी व्यवस्थित चालावे एवढीच अपेक्षा असल्याचे सिब्बल म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER