महापालिकेत घरफाळा घोटाळा चौघे निलंबित

KMC

कोल्हापूर : महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे केली होती. संगणकीय फेरफार करुन घरफाळ्यात सुट दिलेल्या प्रकरणांची गंभीर दखल घेऊन करनिर्धारक दिवाकर कारंडे यांच्यासह घरफाळा अधिक्षक अनिरुध्द शेटये व नितीन नंदवाळकर, असिस्टंट लिपीक विजय खातू यांच्यावर शुक्रवारी निलंबनाची कारवाई केली.

महापालिका मालमता कराची आकारणी व वसुली ही महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसारच झाली पाहिजे. कर आकारणी करताना मनपाचे उत्पन्न वाढीचे उदिष्ट असले पाहिजे. मात्र तसे न करता काही मिळकतीना नियमांना बगल देत, घरफाळ्यात सुट दिली. यासाठी संगणकीय फेरफार केला होता याबाबत शिवसेनेने आयुक्तांकडे तक्रार केली होती. . यानुसार आयुक्तांनी १८ फेब्रुवारीला या चौघांकडून खुलासा मागवून कारणे दाखवा नोटीस बजावली होती. आयुक्तांनी याप्रकरणी चौकशी समितीही नेमली होती. संबंधितांनी केलेला खुलासा आणि चौकशी समितीच्या अहवालानंतर आयुक्तांनी या चौघांवर निलंबनाची कारवाई केली. याप्रकरणी फसवणुकीची जबादारी निश्चित करुन या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी सांगितले.