हे म्हणजे माणुसकीची खालची पातळी गाठण्यासारखं : जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad

मुंबई : बिहारमध्ये सत्ता मिळाल्यास सर्वांना करोनाची लस मोफत दिली जाईल, अशी घोषणा करणाऱ्या भाजपवर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड  (Jitendra Awhad)यांनी ट्वीट करून निशाणा साधला आहे .

‘निवडणुकीच्या प्रचारामध्ये मतं मागण्यासाठी आम्ही तुम्हांला कोरोनाची लस फुकट देऊ हे सांगणं म्हणजे माणुसकिची नीचोत्तम पातळी गाठण्यासारखं आहे. नि:स्वार्थपणे लोकांच्या जीवाची रक्षा करणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यासाठी मतं मागणं हा माझ्या अंदाजाने आचारसंहितेचाही भंग आहे,’ असं आव्हाड यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

समजा, बिहारी जनतेने भाजपला सत्ता दिली नाही तर बिहारला करोनाची लस मिळणार नाही का? असा प्रश्नही त्यांनी केला आहे. हा अमानुषपणा आहे. खरंतर, निवडणूक असो किंवा नसो, संपूर्ण देशाला लस मिळेल असं त्यांनी म्हटलं पाहिजे. अन्यथा महाराष्ट्राला करोनाच्या लसीसाठी चार वर्षे वाट पाहावी लागेल,’ अशी भीती आव्हाड यांनी व्यक्त केली आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER