हाऊसफुल 5 मध्ये कलाकारांची फौज दिसणार

Sajid Nadiadwala - Housefull 5

साजिद नाडियाडवालाने (Sajid Nadiadwala) रुपेरी पडद्यावर ‘हाऊसफुल’ (Housefull) नावाने एक यशस्वी फ्रेंचायजी सादर केली होती. साजिदने तयार केलेले ‘हाऊसफुल’ सीरीजमधील चार सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगलेच धुमाकूळ घालणारे ठरले होते. साजिदचे हे चित्रपट म्हणजे काही महान नसून प्रेक्षकांचे पैसा वसूल मनोरंजन करणारे आहेत. दोन तास डोके बाजूला ठेऊन हे चित्रपट पाहाण्यासारखे होते. प्रेक्षकांनाही असे मनोरंजन हवे असते. त्यामुळेच गेल्या वर्षी आलेल्या ‘हाऊसफुल 4’ ने तर 200 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला होता. यशाची हीच परंपरा पुढे कायम ठेवत साजिदने हाऊसफुल 5 ची नुकतीच घोषणा केली असून या सिनेमात नेहमीच्या कलाकारांसोबतच बॉलिवुडमधील आणखी काही मोठ्या कलाकारांची फौज दिसणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘हाउसफुल 5’ मध्ये नेहमीच्या कलाकारांसोबत दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, जॉन अब्राहम, जॅकलीन फर्नांडिस दिसणार आहे. तसेच ‘बाहुबली’ आणि ‘पद्मावत’प्रमाणे हा सिनेमा आयमॅक्स फॉरमॅटमध्ये शूट केला जाणार आहे. यावेळी साजिद नाडियाडवाला आणि अक्षय कुमार या सिनेमाला कॉमेडी अॅव्हेंजर्स यूनिव्हर्स बनवण्याचा विचार करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER