दस्त नोंदणीची लगबग : ३१ डिसेंबरपर्यंत तीन टक्के सुट

House

मुंबई : राज्य शासनाने ३१ डिसेंबरअखेर दस्त नोंदणीत तीन टक्के सवलत जाहीर केली आहे. त्यामुळे नोंदणी कार्यालयात सध्या लगबग वाढल्याचे चित्र आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील सर्व कार्यालयात रोज सरासरी तीनशे दस्त नोंदणी होत आहे. कोरोनामुळे ही संख्या अवघी २० ते २५ वर आली होती. ३१ डिसेंबरनंतर योजना संपल्यावर पुन्हा नोंदणी कार्यालयात शुकशुकाट राहण्याची भिती आहे. याचा महसुलावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

कोरोनामुळे रखडलेल्या दस्त नोंदणीला चालना देत, रियल इस्टेटला उभारी मिळावी यासाठी राज्य शासनाने १ सप्टेबर २०२०पासून मुद्रांक शुल्कात कपात केली. तीन टक्के मुद्रांक शुल्क व एक टक्का नोंदणी शुल्क या प्रमाणे आकारणी सुरू केली आहे. पूर्वी पाच टक्के मुद्रांक शुल्क, एक टक्का एलबीटी आणि एक टक्का नोंदणी शुल्काची आकारणी होत होती. कर कमी करण्यामागे खरेदी विक्री व्यवहाराला चालना मिळावी आणि त्यातून महसूल मिळावा, असा शासनाचा हेतू आहे. मुद्रांक शुल्कात तीन टक्क्यांची कपात होऊनही सुरुवातीला खरेदी विक्री व्यवहाराला अपेक्षेप्रमाणे गती मिळालेली नव्हती. आता मात्र शेवटचे पंधरा दिवस राहिल्याने लगबग दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER