हॉटेल, सिनेमागृह पुन्हा बंद होणार; राजेश टोपे यांची माहिती

Rajesh Tope

मुंबई :- राज्यात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. ठाकरे सरकारकडून लॉकडाऊनचे संकेत देण्यात आले आहे. राजकीय पक्षासोबत प्रसिद्ध उद्योजकांनीही लॉकडाऊनला (Lockdown) विरोध केला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही लॉकडाऊनसंबंधी महत्त्वाची माहिती दिली आहे.

“हॉटेल, सिनेमागृह आदी गर्दीची ठिकाणे पूर्णपणे बंद करण्याचा विचार करावा लागेल.” असे राजेश टोपे (Rajesh Tope) यावेळी म्हणाले आहे.

तसेच, वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पुढच्या आठवड्यात किती बेड्स उपलब्ध असतील, हे जाणणे गरजेचे आहे. त्यामुळे लॉकडाऊन हा कोणालाच मान्य नाही. कोरोना परिस्थितीत तत्काळ लॉकडाऊन करणे सोपे नाही. याबाबत संपूर्ण अभ्यास करावा लागतो. यावर मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेऊन, चर्चा केली आहे.

“निर्बंध कडक करायचे असतील, तर कसे करायचे, उद्योगांना हात लावू नये, स्थलांतरित मजुरांचा मुद्दा उपस्थित झालेल्या क्षेत्राला हात लावू नये, अशा अनेक गोष्टींचा अभ्यास होत असतो. त्या अभ्यासानंतर निर्णय घेतला जातो. तत्काळ लॉकडाऊनचा निर्णय घेतला जात नाही. निर्बंध कडक करत जावे लागते.” असेही राजेश टोपेंनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button